कान्हेरी गवळीचे ग्रामविकास अधिकारी निलंबित
By admin | Published: June 10, 2017 02:26 AM2017-06-10T02:26:59+5:302017-06-10T02:26:59+5:30
मुख्य कार्यकारी अधिका-यांनी जारी केला आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर (अकोला): पंचायतराज समितीने दिलेल्या भेटीदरम्यान अनुपस्थित आढळलेले कान्हेरी गवळीचे ग्रामविकास अधिकारी जी.के. धाडसे यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी निलंबित केले आहे.
या संबंधीचे आदेश ९ जून रोजी बाळापूर पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत.
पंचायतराज समितीने २ जून रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट दिली होती. यामध्ये कान्हेरी गवळी येथील ग्रामपंचायत कार्यालयाचाही समोवश आहे.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी जी.के. धाडसे हे गैहजर आढळले होते. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सेवेतून निलंबित केले आहे.
धाडसे यांच्याकडील प्रभार हस्तांतरित करून त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेश सीईओंनी गटविकास अधिकारी बाळापूर यांना दिले आहेत, तसेच निलंबनाच्या काळात धाडसे यांचे मुख्यालय मूर्तिजापूर पंचायत समिती राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.