स्वच्छता भारत मिशनमध्ये राज्यात कारंजा नगरपरिषद दुस-या स्थानावर
By admin | Published: March 5, 2017 02:09 AM2017-03-05T02:09:27+5:302017-03-05T02:09:27+5:30
२२११ शौचालयाचे बांधकाम पूर्ण; सर्वेक्षणात आढळला वापर.
कारंजा लाड, दि. ४- स्वच्छ भारत मिशनमध्ये (नागरी) कारंजा नगर पालिकेने उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यात दुसरे स्थान पटकावले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २0१४ मध्ये स्वच्छ भारत मिशनचा नारा देत स्वच्छतेला सुरुवात केली होती. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने गाव व शहर हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला होता. कारंजा नगर पालिकेला शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी ३ हजार ७५१ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आतापयर्ंत २२११ शौचालयाचे बांधकाम झाले असून, नागरिक या शौचालयांचा वापर करीत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. आता ३ हजार ३ हजार ७५१ शौचालयांच्या उद्दिष्टातील उर्वरित सर्वच शौचालयांची कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. २७ फेब्रुवारीला राज्यातील सर्व नगर पालिकांचे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणात सातारा जिल्ह्यातील पन्हाळा नगर पालिका प्रथम स्थानावर, तर कारंजा नगरपरिषदेला द्वितीय स्थान मिळाले आहे.
- नगरपालिकेतील सर्वच सहकार्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून आपली जबाबदारी चोख पार पाडली. आम्हाला महिला बचत गटांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्यामुळेच आम्हाला स्वच्छ भारत अभियानात उत्कृष्ट कामगिरी करुन दुसरे स्थान मिळवता आले.
- प्रमोद वानखडे
मुख्याधिकारी न.प. कारंजा