करडई क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 01:52 PM2019-12-04T13:52:39+5:302019-12-04T13:53:04+5:30

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ४१ हजार तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सर्वात कमी हे क्षेत्र उरले आहे.

Kardai crop sowing area decrease in Vidarbha | करडई क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर!

करडई क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर!

Next

अकोला : करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असून, राज्यात तीन लाख हेक्टरच्यावर असलेले करडईचे क्षेत्र आता केवळ अठरा हजार हेक्टरपर्यंत उरले आहे. हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने करडई पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. यावर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांना करडई पिकाबाबात मार्गदर्शन केले जात आहे; परंतु याहीवर्षी शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरविली आहे.
१९९९-२००० पर्यंत राज्यात करडईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते; परंतु या पिकाला मिळणारे दर अत्यंत कमी आहेत. गतवर्षी तर प्रतिक्ंिवटल दोन ते दोन हजार पाचशे रुपयेच दर होते. हे पीक काटेरी असल्याने काढण्यासाठी या पिकाला मजूर मिळत नाहीत.परिणामी, या पिकाचे क्षेत्र कमी होत गेले. २०११-१२ पर्यंत राज्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्र होते. विदर्भात तर दोन लाख हेक्टर असलेले हे क्षेत्र याच कारणामुळे कमी झाले. २०११-१२ मध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ४१ हजार तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सर्वात कमी हे क्षेत्र उरले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तेलबियांचे अनेक नवे वाण विकसित केले आहे; पण यावर्षीदेखील शेतकºयांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे. मागणी घटल्याने महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने तर करडई बियाण्याचे यावर्षी अल्प नियोजन केले. २०११ पर्यंत राज्यात ४० लाख हेक्टरवर भुईमूग, जवस, सूर्यफूल, करडई व सोयाबीन या तेलबिया पिकांचे उत्पादन घेतले जात होते. यात आता ४ लाख हेक्टरची घट झाली असून, ३६ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली उरले आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या काही वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने या ३६ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये सोयबीनचा वाटा ३२ लाख हेक्टर आहे.

करडईचे पीक आरोग्यवर्धक आहे. विदर्भातील शेतकºयांनी हे पीक घ्यावे, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. चांगले दर मिळाल्यास शेतकरी या पिकाकडे वळतील, असा विश्वास आहे.
- डॉ. एस. बी. साखरे, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ

Web Title: Kardai crop sowing area decrease in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.