काेराेना वाढला पुन्हा काम मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:18 AM2021-03-08T04:18:19+5:302021-03-08T04:18:19+5:30
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या तुलनेत मनुष्यबळ कमी पडत होते. त्यावेळी कंत्राटी तसेच रोजंदारी ...
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या तुलनेत मनुष्यबळ कमी पडत होते. त्यावेळी कंत्राटी तसेच रोजंदारी तत्त्वावर काही पदे भरण्यात आली होती. आता काेराेनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने मध्यंतरी कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आता पुन्हा कामावर बाेलविण्यात आले आहे
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सर्वोपचार रुग्णालयावर रुग्णसेवेचा ताण वाढताच आहे. गत वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. या काळात रुग्णालयातील स्वच्छतेसह इतर कामांसाठी वर्ग चारचे मनुष्यबळ अपुरे ठरत होते. ही उणीव भरून काढण्यासाठी काही पदे कंत्राटी तत्त्वावर, तर काही रोजंदारी तत्त्वावर भरण्यात आले हाेते. काेराेनाचा प्रभाव ओसरताच काेवीड सेंटर बंद करण्यात आले त्यामुळे सहाजिकच ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काेवीड याेद्धा म्हणून सन्मान करण्यात आला हाेता त्यांनाही घरी बसविण्यात आले दूदैवाने आता पुन्हा काराेना वाढला असल्याने मनुष्यबळ कमी पडू लागल्याने त्याच कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बाेलविण्यात आले आहे
बाॅकस
४४ परिचारिका २ तंत्रज्ञ रुजू
काेविड सेंटर वाढल्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आराेग्य विभागाने ४४ परिचारिकांची पदे भरण्याची मागणी केली हाेती त्यानुसार त्यांना ४४ परिचारिकांची पदे मजूर झाली असून या परिचारिका रुजू झाल्या आहेत तर ९ तंत्रज्ञांची मागणी हाेती त्यापैकी दाेन तंत्रज्ञ रूजू झाले आहेत सद्यस्थितीत आरटीपीसीआर प्रयाेगशाळेत १५ तंत्रज्ञ कार्यरत आहेत
काेट
कोविड काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात रोजगार मिळाल्याने या कर्मचाऱ्यांनीही मोठ्या उत्साहात काम केले, परंतु काेराेना कमी हाेताच या कर्मचाऱ्यांनाही कमी करण्यात आले आता पुन्हा कामावर बाेलविले आहेत
हरीश धनगावकर
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात सेवा दिल्याने त्यांनाही कोरोनाचा धोका आहे. त्यांनाही कोविड लसीकरणात प्राधान्य देणे आवश्यक आहे. आता हे कर्मचारी पुन्हा रूजु झाले आहेत त्यामुळे त्यांच्याही आराेग्याची काळजी घेतल्या जावी
नितेश वासनिक
काही पदे कंत्राटी तत्त्वावर, तर काही रोजंदारी तत्त्वावर भरण्यात आले हाेते. कोविड काळात या कर्मचाऱ्यांनीही मोठ्या उत्साहात काम केले, परंतु त्यांचे मानधन नियमित मिळत नव्हते ते नियमित मिळावे
पराग गवई