काेराेना बराेबर जगावे लागेल; निर्बंध शिथिल करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:08+5:302021-04-10T04:18:08+5:30
राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेत केवळ मेडिकल व किराणा दुकान सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु दररोज मोलमजुरी करून हातावर ...
राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेत केवळ मेडिकल व किराणा दुकान सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु दररोज मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या गरिबांचा या लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे इतर आस्थापने सुरु करून गरीब मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच मनपा प्रशासनाकडून लॉकडाऊन काळात सुद्धा अतिक्रमणाची धडक मोहीम राबविण्यात येत असून गरीब लघू व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मनपा प्रशासनाला सदरची मोहीम तातडीने थांबण्याचे निर्देश देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
दंडात्मक कारवाई करा !
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व मनपाच्या समन्वयाने जिल्ह्यात टेस्टिंग वाढविणे, बाजारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर मास्क आहे किंवा नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी,जेणेकरून संक्रमणाला आळा बसेल,अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.