काेराेनाची धास्ती; २३५४ जणांनी दिले नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:59+5:302021-03-25T04:18:59+5:30
काेराेना विषाणूला आळा घालण्यासाठी लसीकरणाला प्रारंभ हाेताच नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढीस लागली. घराबाहेर निघताना ताेंडाला मास्क किंवा रुमाल न लावणे, ...
काेराेना विषाणूला आळा घालण्यासाठी लसीकरणाला प्रारंभ हाेताच नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढीस लागली. घराबाहेर निघताना ताेंडाला मास्क किंवा रुमाल न लावणे, आपसांत चर्चा करताना किमान चार फूट अंतर न राखणे याचे परिणाम समाेर आले आहेत. मागील काही दिवसांपासून शहरात काेराेनाचा झपाट्याने प्रसार झाला आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेरानाची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही बाब पाहता मनपाने शहरात झाेननिहाय चाचणी केंद्र उघडले आहेत. रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता असल्याची बाब उजेडात आल्यानंतर नागरिक काहीअंशी का हाेइना सतर्क झाल्याचे दिसत आहे. बुधवारी तब्बल २३५४ जणांनी चाचणी केंद्रांत जाऊन नमुने दिले. यामध्ये ५७७ जणांनी आरटीपीसीआर चाचणी केली असून १७७७ जणांनी रॅपिड ॲन्टिजेन चाचणी केली आहे. या सर्व संशयितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
पूर्व, पश्चिम झाेनमध्ये प्रादुर्भाव- हाॅटस्पाॅट
शहरात काेराेनाचे सर्वाधिक रुग्ण पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत असतानाच त्यामध्ये आता पश्चिम झाेनची भर पडली आहे. या झाेनमधील रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालल्याचे दिसत आहे. या झाेनमधील नागरिक कमालीचे बेफिकिर आढळून येत आहेत.
शहरात २४६ पाॅझिटिव्ह
जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून मनपाला बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात २४६ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये पूर्व झाेन अंतर्गत ७६, पश्चिम झोन ७५, उत्तर झोन ४० आणि दक्षिण झोन अंतर्गत ५५ असे एकण २४६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.