काटेपूर्णा धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 04:45 PM2019-07-26T16:45:45+5:302019-07-26T16:46:10+5:30

२५ जुलै रोजी महान धरणाची पाणी पातळी ११०९.३० फूट, ३३८.१२ मीटर, २.७२२ द.ल.घ.मी. व ३.१५ टक्के अशी होती.

 Katepurna Dam reached the bottom | काटेपूर्णा धरणाने गाठला तळ

काटेपूर्णा धरणाने गाठला तळ

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
महान : पावसाळ्याचा पूर्ण दीड महिना उलटल्यावरही काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात तीळमात्र वाढ झाली नाही. २५ जुलै रोजी महान धरणाची पाणी पातळी ११०९.३० फूट, ३३८.१२ मीटर, २.७२२ द.ल.घ.मी. व ३.१५ टक्के अशी होती. २५ जुलै २०१८ रोजी धरणात ११२४.४० फूट, ३४२.७२ मीटर, २९.७८९ द.ल.घ.मी. व ३४.४८ टक्के असा जलसाठा उपलब्ध होता. या तुलनेत यावर्षी महान धरणात ३१ टक्के जलसाठा कमी असून, २७ द.ल.घ.मी. पाणी कमी आहे.
गेल्यावर्षी ५ जूनपासूनच धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली होती; परंतु यावर्षी पाऊस नसल्याने धरणाच्या पाणी पातळीत किंचितही वाढ होऊ शकली नाही.
अकोला शहराला पाणी पुरवठ्याकरिता महान धरणात दरवर्षी २४ द.ल.घ.मी. जलसाठा आरक्षित ठेवण्यात येतो; परंतु धरणात एकूण २.७२२ द.ल.घ.मी. पाणी साठा उरल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. महान धरणाचा जिवंत जलसाठा ११०७.०० वर येऊन संपतो. त्यानंतर मृत जलसाठ्यास सुरुवात होते. या पाणी पातळीप्रमाणे महान धरणात केवळ २ फूटच जिवंत जलसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाच्या क्षेत्रात येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास पाणी पुरवठा योजना संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


काटा कोंडाळा नदी अद्यापही कोरडीठण्ण!
महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यासाठी मालेगाव परिसरात दमदार पावसाची आवश्यकता आहे. कारण मालेगाव परिसरातून काटा कोंडाळा, जऊळका, अमनवाडी, मुसळवाडी, धानोरा इत्यादी ठिकाणी पाऊस झाल्यास ते पाणी काटा कोंडाळा नदीने महान धरणात येऊन मिळते. मालेगाव पाणलोट क्षेत्रातील कुरड, सुकांडा, सुधी, कोली, खडकी, मसला, सोनखास, ब्राम्हणवाडा, डव्हा आणि चाका तीर्थ असे दहा लघू तलाव आहेत. ते १०० टक्क्यांपर्यंत भरलेले नाहीत. वरील दहाही लघू तलाव १०० टक्के भरल्याशिवाय त्या भागातील पाणी काटा कोंडळा नदीच्या पात्रात वाहू शकत नाही.

Web Title:  Katepurna Dam reached the bottom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.