कावड महोत्सव; हजारो शिवभक्त गांधीग्रामकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 08:34 PM2017-08-20T20:34:35+5:302017-08-20T20:43:25+5:30

अकोला : शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यासाठी शहरातील असंख्य कावडधारी शिवभक्त गांधीग्रामकडे रविवारी रवाना झाले. सोमवारी सकाळी कावड व पालख्या घेऊन शिवभक्त अकोल्यात दाखल होतील. जुने शहरातून सर्वाधिक कावड काढणाºया असंख्य मंडळांनी रविवारी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले. 

Kavad Mahotsav; Thousands of Shiv devotees leave for Gandhiji | कावड महोत्सव; हजारो शिवभक्त गांधीग्रामकडे रवाना

कावड महोत्सव; हजारो शिवभक्त गांधीग्रामकडे रवाना

Next
ठळक मुद्देजुने शहरात शिवभक्तांचा जल्लोषसोमवारी सकाळी कावड व पालख्या घेऊन शिवभक्त अकोल्यात दाखल होतील

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यासाठी शहरातील असंख्य कावडधारी शिवभक्त गांधीग्रामकडे रविवारी रवाना झाले. सोमवारी सकाळी कावड व पालख्या घेऊन शिवभक्त अकोल्यात दाखल होतील. जुने शहरातून सर्वाधिक कावड काढणाºया असंख्य मंडळांनी रविवारी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले. 

शिवभक्तांमध्ये रंगली स्पर्धा
गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने श्री राजेश्वराला जलाभिषेक करण्याची ७१ वर्षांची परंपरा आहे. खांद्यावरून सर्वाधिक भरणे आणण्याची स्पर्धा कावडधारी शिवभक्तांमध्ये रंगली आहे. 

जुने शहरातून सर्वाधिक कावड
जुने शहरातून सर्वाधिक भरणे असलेली कावड डाबकी रोडवासी मित्र मंडळाची असून, यंदा ७७१ भरण्यांची कावड काढली जात आहे. त्यापाठोपाठ हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळाची ७५१ भरणे, मानाचे स्थान असलेल्या हरिहर शिवभक्त मंडळाची ४०१ आणि सर्वाधिक चार हजार सदस्य असलेल्या जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १११ भरण्यांची कावड अकोलेकरांसाठी आकर्षण ठरणार आहे.

Web Title: Kavad Mahotsav; Thousands of Shiv devotees leave for Gandhiji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.