लाखपुरी येथे संचारबंदीच्या नियमात कावड उत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:48+5:302021-09-08T04:24:48+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यातील विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान, लाखपुरी येथे परंपरेनुसार श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणारा कावड उत्सव ...
मूर्तिजापूर : तालुक्यातील विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान, लाखपुरी येथे परंपरेनुसार श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणारा कावड उत्सव कोरोना निर्बंधामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यावर्षी रविवार, सोमवारी लाखपुरीत संचारबंदी लागू केली होती; परंतु कावड परंपरा कायम रहावी यासाठी प्रशासनाने दरवर्षी मूर्तिजापूर, दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातून येणाऱ्या कावड मंडळाच्या पुजाऱ्याला एका सहकाऱ्यांसह लाखपुरीला येऊन पूर्णा नदीचे जल नेण्यास परवानगी दिली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार डी. एस. पांडव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कावड मंडळाने शासकीय नियमाचे पालन करून कावड उत्सव पार पाडला. यावेळी एसआरपी तुकडी अमरावती बंदोबस्तात होती. कावड यात्रा यशस्वीतेसाठी प्रयत्न करणारे मूर्तिजापूर, दर्यापूर तालुक्यातील पोलीस प्रशासन, कावड मंडळ पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन, आपत्कालीन पथक यांचे लक्षेश्वर संस्थानतर्फे आभार मानले.