अकोल्यात कावड महोत्सवाचा जल्लोष, हजारो शिवभक्तांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 02:58 PM2017-08-21T14:58:41+5:302017-08-21T19:20:19+5:30

अकोला, दि. 21 - अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यासाठी शहरातील असंख्य कावड धारी ...

The Kawad Mahotsav celebrations in Akola, thousands of Shiva Bhaktas participated | अकोल्यात कावड महोत्सवाचा जल्लोष, हजारो शिवभक्तांचा सहभाग 

अकोल्यात कावड महोत्सवाचा जल्लोष, हजारो शिवभक्तांचा सहभाग 

googlenewsNext

अकोला, दि. 21 - अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यासाठी शहरातील असंख्य कावडधारी शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णानदीचे पाणी घेऊन अकोल्यात दाखल झाले आहेत. गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने श्री राजेश्वराला जलाभिषेक करण्याची 71 वर्षांची परंपरा आहे. खांद्यावरून सर्वाधिक भरणे आणण्याची स्पर्धा कावडधारी शिवभक्तांमध्ये रंगली आहे. 


जुने शहरातून सर्वाधिक भरणे असलेली कावड डाबकी रोडवासी मित्र मंडळाची असून, यंदा ७७१ भरण्यांची ( कळशी) कावड काढली आहे. त्यापाठोपाठ हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळाची ७५१ भरणे, मानाचे स्थान असलेल्या हरिहर शिवभक्त मंडळाची ४०१ आणि सर्वाधिक चार हजार सदस्य असलेल्या जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १११ भरण्यांची कावड अकोलेकरांसाठी आकर्षण ठरली आहे. 

{{{{dailymotion_video_id####x845a4x}}}}

Web Title: The Kawad Mahotsav celebrations in Akola, thousands of Shiva Bhaktas participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.