घरचे सोयाबीन बियाणे जपून ठेवा - डॉ. इंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:19 AM2021-03-23T04:19:57+5:302021-03-23T04:19:57+5:30
मागील अनुभव बघता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बियाणे बाजारातून विकत घेऊन पेरले. प्रत्यक्षात सोयाबीन हे स्वपरागीकरण असणारे पीक आहे. ...
मागील अनुभव बघता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बियाणे बाजारातून विकत घेऊन पेरले. प्रत्यक्षात सोयाबीन हे स्वपरागीकरण असणारे पीक आहे. त्यामुळे एकदा विकत घेतलेले प्रमाणित बियाणे सलग ३ वर्षे वापरू शकतो. दरवर्षी सोयाबीन बियाणे बाजारातून घेण्याची आवश्यकता नाही. एकूण पीक उत्पादन खर्चात बियाण्यांवर होणारा खर्चाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे विश्वासातील घरचे किंवा आपल्याजवळच्या शेतकरी बांधवाचे उत्तम दर्जेदार सोयाबीन उगवण क्षमता चाचणी घेऊन बियाणे म्हणून वापरले तर बियाण्यावर होणारा खर्च कमी करता येतो. सोबतच खासगी कंपन्यांकडून विकत घेतलेल्या बियाण्यांच्या उगवणी संदर्भीय येणाऱ्या तक्रारीवरून घरचे दर्जेदार सोयाबीन उगवण चाचणी घेऊन बियाणे म्हणून वापरणे कधीही चांगले आहे.
सद्यस्थितीत प्रति क्विंटल पाच हजारावर भाव मिळतो, म्हणून ते विकून टाकायचे व परत दोन महिन्यांनी तेच सोयाबीन दीडपट रक्कम देऊन बाजारातून विकत घेणे हे किफायतशीर नाही. त्यामुळे उत्तम प्रतीचे दर्जेदार सोयाबीन हे उगवण क्षमता चाचणी घेऊन बियाणे म्हणून जपून ठेवावे असे आवाहन करण्यात आले.