आधी कार्यालयात स्वच्छता राखा; अकाेलेकरांशी साैजन्याने वागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:20 AM2021-09-18T04:20:57+5:302021-09-18T04:20:57+5:30

नवनियुक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी शुक्रवारी मनपातील अनेक विभागांची पाहणी केली. यावेळी मळकटलेले सूचना फलक, भिंतीच्या काेपऱ्यात गुटखा व ...

Keep the office clean first; Be kind to Akalekars! | आधी कार्यालयात स्वच्छता राखा; अकाेलेकरांशी साैजन्याने वागा!

आधी कार्यालयात स्वच्छता राखा; अकाेलेकरांशी साैजन्याने वागा!

Next

नवनियुक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी शुक्रवारी मनपातील अनेक विभागांची पाहणी केली. यावेळी मळकटलेले सूचना फलक, भिंतीच्या काेपऱ्यात गुटखा व पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. नागरिकांना सहज व साेप्या पद्धतीने समजतील, अशा रितीने सूचना फलक असावेत. जुने फलक काढून त्यात सुधारणा करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. कार्यालयात खितपत पडलेल्या जुन्या साहित्याची विल्हेवाट लावण्याची सूचना आयुक्तांनी केली. दरम्यान, मनपात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांशी आयुक्तांनी संवाद साधला. यावेळी रोखपाल विभाग, आवक-जावक विभाग, दिव्यांग कक्ष, भांडार विभाग, संगणक विभाग, नागरी सुविधा केंद्र, देयक विभाग, जलप्रदाय, मालमत्ता कर, तसेच अभिलेखा विभागाची पाहणी केली.

फायर ऑडिटचा दिला आदेश

विविध विभागांत अग्निशमन उपकरणांचा अभाव असल्याचे आयुक्त द्विवेदी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मनपातील सर्व विभागांचे फायर ऑडिट करण्याचा आदेश त्यांनी उपस्थित उपायुक्त डाॅ.पंकज जावळे यांना दिला.

विभाग प्रमुखांकडून घेतला आढावा

आयुक्त द्विवेदी यांनी मनपाचे प्रशासकीय कामकाज समजून घेण्यासाठी विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला. विभागनिहाय सुरू असलेले कामकाज व स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल आयुक्तांना अवगत करून देण्यात आले. काही विभाग प्रमुख अधिकार क्षेत्रात नसतानाही इतर विभागांच्या कामकाजात नाहक हस्तक्षेप करीत असल्याचेही आयुक्तांच्या लक्षात आणून देण्यात आले.

बाेलघेवडे अधिकारी गायब

मनपातील सर्वच विभाग प्रमुखांना कामचुकार अथवा भ्रष्ट म्हणणे याेग्य ठरत नाही. काही विभाग प्रमुख प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात. हे काेराेना काळात दिसून आले आहे, परंतु मनपाच्या प्रत्येक विभागाची जणू काही आपल्यालाच इत्थंभूत माहिती असण्याचा आव आणणारे काही बाेलघेवडे अधिकारी शुक्रवारी गायब हाेते, हे विशेष.

Web Title: Keep the office clean first; Be kind to Akalekars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.