अहंम् बाजूला ठेवून जीवनात सेवा, सर्मपण अंगिकारा - डॉ. स्मिता कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 08:45 PM2017-12-24T20:45:47+5:302017-12-24T20:46:47+5:30

सेवा है यज्ञकुंड..समिधासम हम जले..या वृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत मेळघाट येथील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त आयोजित महिला संमेलनात त्यांनी आपले विचार प्रकट केले.

Keeping ego aside, serving life, Sarampan Angikara - Dr. Smita Kolehe | अहंम् बाजूला ठेवून जीवनात सेवा, सर्मपण अंगिकारा - डॉ. स्मिता कोल्हे

अहंम् बाजूला ठेवून जीवनात सेवा, सर्मपण अंगिकारा - डॉ. स्मिता कोल्हे

Next
ठळक मुद्देमहिला संमेलनात झाले कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीवर विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जन्माला आल्यावर कोणीच सोबत खिसा घेऊन येत नाही आणि जातानासुद्धा कोणी खिशात काहीच घेऊन जाऊ शकत नाही. अवतीभवती फिरताना, निराशेचे वातावरण, दु:ख, दारिद्रय़ दृष्टीस पडतं. त्यामुळे स्वत:तील अहंम् बाजूला ठेवून जीवनामध्ये सेवा, सर्मपणाचा भाव अंगिकारावा. सेवा है यज्ञकुंड..समिधासम हम जले..या वृत्तीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत मेळघाट येथील ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केले. 
अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने स्वराज्य भवन प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ४९ वा पुण्यतिथी-पुण्यस्मरण महोत्सवास शनिवारपासून सुरुवात झाली. रविवारी या महोत्सवामध्ये दुपारी महिला संमेलन पार पडले. महिला संमेलनामध्ये महिलांची कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता कोल्हे होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून यावली शहिद येथील भाग्यश्री देशमुख, सुधा जवंजाळ, अँड. श्रद्धा आखरे, शैलजा गावंडे, साक्षी पवार, ग्रामगिताचार्य मंगला पांडे, माजी नगरसेविका पुष्पा गुलवाडे आदी होत्या. 
डॉ. स्मिता कोल्हे म्हणाल्या की, माझं शिक्षण नागपुरात झालं. एक मुलगी. अनेक अडचणी आल्या; परंतु जिद्दीने अभ्यास केला. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर वकीलीचं शिक्षण घेतलं. नागपुरात दवाखाना थाटला. चांगला जम बसला. पैसाही मिळत होता. सुखसंपन्नता नांदत होती; परंतु समाधान नव्हते. अशातच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांच्याशी परिचय झाला. त्यांनी लग्न करायचे असेल तर  चारशे रुपये महिन्याने घर चालविता आले पाहिजे, दररोज ४0 किमी पायी चालावे लागेल, ५ रुपयांमध्ये लग्न लावावे लागेल आणि वेळप्रसंगी भीक मागावी लागेल. या चार माझ्यासमोर अटी  ठेवल्या. या अटी मी मान्य केल्या आणि मेळघाटमधील जगाशी संपर्क नसलेले बैरागड गावी गेले. पतीसोबत आदिवासींची सेवा करण्यास सुरुवात केली. असं सांगत, डॉ. कोल्हे यांनी, सुखाचा त्याग करून मी अंधारात, जात्यावर दळणं, चूल पेटवणं, सारं काही शिकले.  डॉक्टर होण्यापेक्षा आदिवासी बनून आम्ही जीवन जगलो. स्वत:तला अहंम् बाजूला ठेवला, असे सांगत, त्यांनी जीवनातील अनेक अनुभव यावेळी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ममता इंगोले यांनी केले. 

महिला संमेलनात महिलांच्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदारीवर विचारमंथन
महिला संमेलनामध्ये अँड. श्रद्धा आखरे हिने, देशात हुंडा प्रतिबंधक कायदे आहेत; परंतु कायद्याची अंमलबजावणी होत नाही. हुंडा देणे व घेण्याचे प्रकार समाजात सर्रास घडत आहेत.  त्यामुळे महिला व युवतींनी हुंडा न देण्याचे धाडस दाखवावे, असे मत व्यक्त केले. साक्षी पवार हिने ग्रामगितेमध्ये राष्ट्रसंतानी महिलोन्नतीचा अध्याय आहे, त्यामुळे ग्रामगितेचा विचार महिलांनी घरामध्ये रूजविण्याची गरज आहे, असे मत मांडले. भाग्यश्री देशमुख, सुधा जवंजाळ, शैलजा गावंडे यांनी महिलांची कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी विषयावर मत व्यक्त केले. 

Web Title: Keeping ego aside, serving life, Sarampan Angikara - Dr. Smita Kolehe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.