केशवराव कोहर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:59+5:302021-05-29T04:15:59+5:30
-------------------------------- पिसाबाई वाघमारे कानशिवणी : कानशिवणी येथील पिसाबाई महादेवराव वाघमारे (१०९) वर्षे यांचे दि. २७ मे रोजी वयोवृद्धापकाळाने ...
--------------------------------
पिसाबाई वाघमारे
कानशिवणी : कानशिवणी येथील पिसाबाई महादेवराव वाघमारे (१०९) वर्षे यांचे दि. २७ मे रोजी वयोवृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा आप्त परिवार आहे. (फोटो)
-------------------------
तेल्हारा-हिवरखेड रस्त्यावर खड्डे
तेल्हारा : अकोट-तेल्हारा, तेल्हारा हिवरखेड रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अकोट-तेल्हारा हिवरखेडमार्गे दयनीय अवस्थेचा झाला असून, या रस्त्यावर दररोज अपघाताच्या घटना घडत आहे. सर्वसामान्यांना हा रस्ता धोकादायक ठरत असताना बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
--------------------
नांदखेड ते खिरपुरी रस्त्याची दैना
बाळापूर : गत काही दिवसांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आलेल्या नांदखेड ते खिरपुरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या सदोष बांधकामामुळे अपघात बळावले आहेत. रस्त्यावर गिट्टीचे साम्राज्य असल्याने दुचाकी घसरून अपघात घडत आहेत. याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-------------------------
कार्यालयांमध्ये तक्रारपेट्यांची मागणी
मूर्तिजापूर : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. तक्रारी निराकरण करण्यासाठी शासकीय कार्यालयांत तक्रारपेट्या लटकाविलेल्या दिसायच्या. मात्र, या तक्रारपेट्या आता गायब झाल्या आहेत.
-------------------------
ग्रामीण भागात अवैध व्यवसाय जोमात
पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे फोफावले आहेत. काही महिन्यांपासून या परिसरात रेती वाहतूक, दारू, जुगार व गुटखा विक्री अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. पोलिसांना माहिती असली तरी कारवाईसाठी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.
-------------------------------
नांदखेड खुरेशी येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी
बाळापूर : तालुक्यातील टाकळी खुरेशी, नांदखेड येथे प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथे प्रवासी निवारा झाल्यास याचा फायदा गाव परिसरातील नागरिकांना होेऊ शकतो. प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.
-------------------------
डासांचा प्रादुर्भावामुळे आरोग्य धोक्यात
तेल्हारा : गावात तसेच परिसरात डासांसह लहान किड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे अनेक आजार डोके वर काढत असल्याचे दिसते. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
---------------------------------------
वृक्षांच्या कत्तलीमुळे पर्यावरणप्रेमींत रोष
अकोला : जिल्ह्यातील बऱ्याच मार्गांवर विकासकामांच्या आड येणाऱ्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. परिणामी, पर्यावरणाचे नुकसान होत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. जिल्ह्यात रस्ता कामात हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. नवीन झाडांचे संगोपन व्यवस्थित केले जात नाही. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
-------------------------------------------
मोबाइलचा अतिवापर ठरतोय धोकादायक
खानापूर : नागरिकांना मोबाइल जीव की प्राण झाला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हातात खेळण्याप्रमाणे स्मार्टफोन, सुपरफोन दिसतात. मोबाइलचा हा अतिवापर आजारांना जन्म देणारा ठरत आहे. कानासह डोळे व डोक्याचे आजार जडत आहेत. यात बालकांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.
------- ----------------------------------
बाजारपेठेत सुट्या पैशांचा तुटवडा
वाडेगाव : ग्रामीण भागात नोटाबंदीनंतर चिल्लरचा कमालीचा तुटवडा जाणवत आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने आर्थिक व्यवहार करताना अडचण येत आहे. अनेक ठिकाणी चिल्लर मिळत नसल्याने नागरिकांना भटकावे लागत आहे. चिल्लर नसल्याने दुकानदार, ग्राहक दोघांनाही फिरावे लागते.
------------------
पणज, धामणगाव परिसरातील शेतरस्त्यांची दुरवस्था!
पणज : अकोट तालुक्यातील पणज व वडाळी देशमुखच्या मध्यभागी कोट्यवधी रुपये खर्च करून शहापूर बृहत प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या बॅक वाॅटरमुळे पणज, धामणगाव परिसरातील शेतरस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी शेतरस्तांची कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे.