दुर्धर आजारी रुग्णांना अर्थसाह्य देण्यावरून खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:56 AM2021-01-08T04:56:12+5:302021-01-08T04:56:12+5:30
मंगळवारी झालेल्या आराेग्य समितीच्या सभेत दुर्धर आजारी रुग्णांना अर्थसाह्य करण्यावर चर्चा झाली. तसेच एनआरएचएमअंतर्गत उपकेंद्रात पाणीपुरवठ्यासाठी सर्वेक्षण न करताच ...
मंगळवारी झालेल्या आराेग्य समितीच्या सभेत दुर्धर आजारी रुग्णांना अर्थसाह्य करण्यावर चर्चा झाली. तसेच एनआरएचएमअंतर्गत उपकेंद्रात पाणीपुरवठ्यासाठी सर्वेक्षण न करताच अंदाजपत्रक तयार केल्याचे समाेर आले. सभेला जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य व अर्थ समिती सभापती सावित्रीबाई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आरोग्य विषय समिती सभेला पुष्पा इंगळे, अर्चना राऊत, प्रमोदिनी दांदळे, गोपाल भटकर, अनंत अवचार, गणेश बोबळे, अकोला पंचायत समिती सभापती वसंतराव नागे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. वाय. असोले यांनी समिती कामकाज पाहिले. जिल्हा परिषदेच्या आराेग्य समितीच्या सभेत दुर्धर आजारी रुग्णांना अर्थसाह्य देण्यावरून वादळी चर्चा झाली. लाभ मिळण्यासाठी आता वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्रही ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.