खैरागड चषक : अकोला ३१४ धावांनी विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 02:12 PM2020-03-09T14:12:12+5:302020-03-09T14:12:19+5:30
वेदांत मुळे याने ८ चौकार आणि ५ षट्कारांसह नाबाद शतक पूर्ण केले.
संघादणदणीत विजय
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: वेदांत मुळे, पीयूष सावरकर आणि सिद्धांत मुळे यांच्या लक्षवेधी खेळीमुळे अकोला जिल्हा संघाने बुलडाणा संघावर ३१४ धावांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळविला. रविवारी खैरागड चषक आंतरजिल्हा क्रि केट स्पर्धेतील पाचवा सामना अकोला क्रिकेट क्लब मैदानावर खेळला गेला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी अकोला संघाने ९५ धावांनी आघाडी मिळविली होती. अकोला संघाने ४८ षटकांत सर्वबाद २२४ धावा काढल्या होत्या. यामध्ये सिद्धांत मुळे याने नाबाद ८७ धावा नोंदविल्या होत्या. बुलडाण्याच्या संकेत गावंडे याने ४ गडी बाद केले. बुलडाणा संघाने ३५.१ षटकांत सर्वबाद १२९ धावा काढल्या होत्या. अक ोल्याच्या पीयूष सावरकरने ५ गडी बाद केले होते. अकोला संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात करू न एकही गडी न गमविता २ षटके खेळली. रविवारी दुसºया दिवशीच्या अकोला संघाने डाव पुढे सुरू केला. अकोलाने ५८ षटकांत ७ गडी गमावत २८२ धावा काढल्या. वेदांत मुळे याने ८ चौकार आणि ५ षट्कारांसह नाबाद शतक पूर्ण केले. सिद्धांत मुळे याने ८३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बुलडाणाच्या संकेत गावंडेने गोलंदाजीत कमाल करीत तब्बल ७ गडी बाद केले; परंतु बुलडाण्याच्या खेळाडूंनी फ लंदाजीत कामगिरी करू शकला नाही. अकोल्याच्या भेदक गोलंदाजीसमोर झटपट मैदान सोडले. आकाश राऊत आणि समीर डोईफोडे यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. पीयूष सावरकरने २ गडी बाद केले. बुलडाणा संघाने १७.२ षटकांत सर्वबाद ६३ धावाच काढू शकला.