शहापूर प्रकल्पासाठी खैरात; शेतकर्‍यांना मोबदल्यासाठी आखडता हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:47 AM2018-02-09T01:47:39+5:302018-02-09T01:48:03+5:30

अकोट : शहापूर धरण प्रकल्पाची किंमत १६.६१ कोटी रुपयांवरून ४६.0७ कोटींवर पोहोचली; मात्र प्रकल्पासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना अल्प मोबादला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धरण बांधकामाचा आदेश हा ५ डिसेंबर २00५ रोजी कंत्राटदाराला देण्यात आला. या धरणाकरिता लागणार्‍या बुडीत क्षेत्रातील जमिनीची भूसंपादन प्रक्रिया डिसेंबर-२00५ सुरू करून मोबदल्याचा निवाडा हा सन २00८ मध्ये करण्यात आला आहे. धरणाची रक्कम तिप्पट वाढूनही अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अल्प मोबदला मिळाल्याची चौकशी करण्याची गरज आहे. 

Khairat for Shahpur project; Hands on hand for compensation for farmers! | शहापूर प्रकल्पासाठी खैरात; शेतकर्‍यांना मोबदल्यासाठी आखडता हात!

शहापूर प्रकल्पासाठी खैरात; शेतकर्‍यांना मोबदल्यासाठी आखडता हात!

Next

विजय शिंदे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : शहापूर धरण प्रकल्पाची किंमत १६.६१ कोटी रुपयांवरून ४६.0७ कोटींवर पोहोचली; मात्र प्रकल्पासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना अल्प मोबादला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धरण बांधकामाचा आदेश हा ५ डिसेंबर २00५ रोजी कंत्राटदाराला देण्यात आला. या धरणाकरिता लागणार्‍या बुडीत क्षेत्रातील जमिनीची भूसंपादन प्रक्रिया डिसेंबर-२00५ सुरू करून मोबदल्याचा निवाडा हा सन २00८ मध्ये करण्यात आला आहे. धरणाची रक्कम तिप्पट वाढूनही अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अल्प मोबदला मिळाल्याची चौकशी करण्याची गरज आहे. 
शिवपूर कासोद या भागात धुरर्डी नदीवर धरण बांधण्यात येत आहे. लघुपाटबंधारे बांधकाम विभागांतर्गत १५.६१ कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाला २७ फेब्रुवारी २00४ रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. या कामाचा कार्यारंभ आदेश ५ डिसेंबर २00५ रोजी बियाणी नामक कंत्राटदारास देण्यात आला. सदर प्रकल्प हा सन २00८ पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी होता; परंतु १३ वर्षे उलटूनही अद्यापही  हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला नाही. धरण प्रकल्पाची किंमत वाढत गेली; मात्र भूसंपादन प्रक्रियेमध्ये शेतकर्‍यांना २00५ पासून अडकवून ठेवण्यात आले. 
जमिनी ताब्यात घेण्यापूर्वी कामाचे आदेश दिल्या गेले. शेतकर्‍यांना मात्र २0 ऑगस्ट २00८ मध्ये निवाडा देत मोबदला देण्यात आला. 
त्यामुळे धरणाची किंमत वाढली असताना २00५ पासून जमिनीची किंमत का वाढवली नाही, अल्प मोबदला का देण्यात आला, निवाडा होण्यापूर्वी धरण कामाचा आदेश कसा काय देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करीत भूसंपादन प्रक्रिया-निवाडा तसेच धरण प्रकल्पाची वाढलेली किंमत पाहता संपूर्ण भूसंपादन प्रक्रियेमध्ये गौडबंगाल झाल्याची शक्यता शेतमालकाचे शेतमजूर झालेल्या रामदास राऊत यांच्यासह प्रकल्पगस्त शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

जमिनी देणारे शेतकरी झाले शेतमजूर! 
धरण मातीचे असलेल्या या धरणाची लांबी २२८७ मीटर, तर उंची १८.६१ मीटर आहे. या धरणात ३.४४ दलघमी जलसाठा होणार असून, ३८0 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या धरणाकरिता परिसरातील १२८.९५ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ २५१ हेक्टरकरिता प्रकल्प उभारून शेतकर्‍यांना शेतमालकाचे शेतमजूर करण्यात आले आहे. शिवपूरचे रामदास राऊत यांच्या कुटुंबाची साडेदहा एकर शेती संपादित करण्यात आली. त्या मोबदल्यात त्यांना ५ लाख ३0 हजार रुपये देण्यात आले होते. शेतकर्‍याचा शेतमूजर झालेल्या राऊत कुटुंबीयांना सरकारी नोकरी देऊन वाढीव मोबदला मिळणार, ई-क्लासची जमीन मिळणार, अशी विविध आश्‍वासने त्यावेळी देण्यात आली; परंतु त्याची पूर्तता अद्यापही झाली नाही. अशातच भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने मृत्यूला कवटाळणार्‍या धर्मा पाटील यांच्यासारखी व्यथा शिवपूरच्या रामदास राऊत यांच्यासह इतर शेतकर्‍यांची झाली आहे.

प्रकल्प रखडल्याने कंत्राटदार बदलला! 
या धरणाचे काम बियाणी नामक कंत्राटदाराला देण्यात आले होते; परंतु २२ टक्के बिलात काम घेतले. कंत्राटदाराने मातीचे कारण पुढे करीत प्रकल्पाचे काम बंद ठेवल्याने कंत्राटदाराला ८३ लाख रुपये दंड ठोठावला होता. अखेर कंत्राटदाराचे काम बंद करून पाटबंधारे विभागाने नोव्हेंबर २0१५  पासून स्वत: अर्धवट स्थितीत असलेल्या या प्रकल्पाचे काम हाती घेतले असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली.ं

Web Title: Khairat for Shahpur project; Hands on hand for compensation for farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.