‘खाकी’ची रोगप्रतिकारशक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:18 AM2021-05-22T04:18:04+5:302021-05-22T04:18:04+5:30

अकोला : जनतेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहणाऱ्या पोलीस दलालाही कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. संसर्गाच्या पहिल्या लाटेत २३ अधिकारी ...

‘Khaki’s’ immunity increased; Overcome the corona in the second wave | ‘खाकी’ची रोगप्रतिकारशक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात

‘खाकी’ची रोगप्रतिकारशक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात

Next

अकोला : जनतेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहणाऱ्या पोलीस दलालाही कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. संसर्गाच्या पहिल्या लाटेत २३ अधिकारी व १४५ कर्मचारी बाधित झाले होते. या काळात एका अंमलदाराचा कोरोनाने मृत्यू झाला; तर संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतही ‘खाकी’वर कोरोनाचे संकट कायम असून ६४ जण बाधित झाले; मात्र सततचा व्यायाम, प्राणायाम, ज्यूसचे प्राशन आदींव्दारे रोगप्रतिकारशक्ती वाढवून दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ५४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. फेब्रुवारीअखेर कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ३० हजार ९३४ होता; मात्र त्यानंतर सातत्याने रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत गेली. २० मे अखेर हा आकडा ३७ हजार २७ वर पोहोचला आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत अर्थात २५ फेब्रुवारी २०२१ पूर्वी २३ अधिकारी आणि १४५ अंमलदार अशा एकूण १६८ जण कोरोना बाधित झाले होते. त्यापैकी एका अंमलदाराचा मृत्यू झाला; तर १५ फेब्रुवारी ते १९ मे २०२१ या कालावधीत ६ अधिकारी आणि ५८ अंमलदार अशा एकंदरीत ६४ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील १० जणांवर सध्या उपचार सुरू असून बाकी कोरोनामुक्त झाले आहेत. दुसऱ्या लाटेत कोणाचाही सुदैवाने मृत्यू झाला नाही.

....................

पहिली लाट

पोलीस - १६८

पोलीस मृत्यू - ०१

.............................

दुसरी लाट

पोलीस - ६४

पोलीस मृत्यू - ००

............................

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन व्यायाम, प्राणायाम

पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना सदैव ‘फिट ॲण्ड फाईन’ राहावे लागते. ही जाणीव ठेवून कोरोनाची बाधा होऊनही त्यातून अनेक अधिकारी, कर्मचारी अल्पावधीतच सुरक्षितरीत्या बाहेरही आले. दैनंदिन व्यायाम, प्राणायाम, फळांच्या ज्यूसचे प्राशन करण्याचा फायदा झाल्याचे काहींनी सांगितले.

.....................

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने संपूर्ण जिल्ह्याला आपल्या कवेत घेतले आहे. समाजाचाच एक भाग असलेले पोलीस तरी त्यातून कसे सुटणार? वर्षभरात २०० पेक्षा जास्त अधिकारी व अंमलदार कोरोना बाधित झाले; मात्र आज रोजी सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.

- विलास पाटील

प्रमुख विशेष पथक व दहशतवाद विरोधी पथक

............

सकाळ-सायंकाळच्या सुमारास मैदानावर हजर राहून शारीरिक कसरती करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली; मात्र त्यातून ते यशस्वीरीत्या बाहेरही पडले. सततच्या व्यायामामुळे त्यांच्यावर जीवघेणे संकट ओढवले नाही, ही बाब दिलासा देणारी ठरली.

- शैलेश सपकाळ

स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख

..............

वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चोख अंमलबजावणी केली जात आहे. यादरम्यान पहिल्या लाटेत १६८ व दुसऱ्या लाटेत ६४ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील एकाचा मृत्यूही झाला. इतर जवानांनी मात्र यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे.

- जी. श्रीधर

जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला

Web Title: ‘Khaki’s’ immunity increased; Overcome the corona in the second wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.