खामगाव बाजार समितीला मुगाची प्रतीक्षा

By admin | Published: September 16, 2014 06:33 PM2014-09-16T18:33:10+5:302014-09-16T18:33:10+5:30

उत्पादनात घट : गतवर्षी ५00 तर यावर्षी केवळ ११ पोत्यांची आवक

The Khamgaon Market Committee waiting for the mug | खामगाव बाजार समितीला मुगाची प्रतीक्षा

खामगाव बाजार समितीला मुगाची प्रतीक्षा

Next

खामगाव : शेतकर्‍यांचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुगाचा यावर्षी वरुणराजाच्या अवकृपेने अत्यल्प पेरा झाला आहे. गतवर्षी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजच्या दिवशी ५00 पोत्यांची आवक होती. तर यावर्षी केवळ ११ पोते मुगाची आवक असल्याने बाजार समितीला मुगाची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते. यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाळा तब्बल दीड महिना उशिराने सुरू झाला. यामुळे शेतकर्‍यांचे पेरणीचे नियोजन बिघडले. खरीप हंगामात नगदी पीक म्हणून शेतकरी मूग, उडिदाची पेरणी करीत असतो. मूग विक्रीमुळे शेतकर्‍यांजवळ इतर पिकांच्या मशागतीसाठी पैसा हातात येत असल्याने शेतकरी समाधानी राहत होता. मूग, उडिदाच्या नगदी पिकाच्या भरवशावर लोकांची देणी तसेच शेतकर्‍यांच्या दिवाळी-दसर्‍याच्या खर्चाची चिंता मिटते. घरात दोन पैसे आले म्हणजे शेतकर्‍यांचे सणासुदीचे दिवस चांगले जातात; मात्र यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पेरण्या उशिरा झाल्या. त्यामुळे शेतकर्‍यांनी मूग व उडिदाचा पेरा कमी केला. ज्या शेतकर्‍यांनी मुगाची पेरणी केली, ते पीकसुद्धा पाण्याअभावी पीक जळाले. खामगाव तालुक्यात खरिपाच्या ७३ हजार ७0४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, यापैकी केवळ ११३0 हेक्टरवर मुगाचा पेरा झाला आहे. तीन महिन्याचा पावसाळा संपला असून, आजपर्यंत तालुक्यात ४५२.७ मिमी पावसाची यंदा नोंद आहे. तर मागील वर्षी ७१५.६ मिमी पाऊस झाला होता. खामगाव बाजार समितीत जिल्हय़ातील शेतकर्‍योबरोबर अकोला व वाशिम जिल्हय़ातील शेतकरीही शेतमाल विक्रीस आणतात; परंतु यावर्षी पाऊसच उशिरा सुरू झाल्याने शेतकर्‍यंचे गणित बिघडले. मुगाचा अल्प पेरा झाल्याने अद्यापही बाजार समितीत शेतकर्‍यांची गर्दी दिसून येत नाही. यावर्षी मुगाला ३२00 ते ५२00 रुपये एवढा भाव होता. तर यावर्षी ३६00-६६00 रुपयापर्यंत भाव मिळत आहे; मात्र तरीही बाजार समितीला मूग सापडेनासा झाला आहे.

Web Title: The Khamgaon Market Committee waiting for the mug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.