खामगाव पालिका कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 05:34 PM2018-12-31T17:34:09+5:302018-12-31T17:34:46+5:30
खामगाव : नगर पालिका कर्मचाºयांनी २९ जानेवारीपासून सुरू केलेले काळीफित आंदोलन सोमवारी आणखी तीव्र केले. सोमवारी सकाळी पालिका कर्मचाºयांनी निदर्शने करून शासनाचा निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : नगर पालिका कर्मचाºयांनी २९ जानेवारीपासून सुरू केलेले काळीफित आंदोलन सोमवारी आणखी तीव्र केले. सोमवारी सकाळी पालिका कर्मचाºयांनी निदर्शने करून शासनाचा निषेध नोंदविला.
नगर पालिका कर्मचाºयांना विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, रोजंदारी कर्मचारी कायम करणे, २४ वर्ष कालबद्ध पदोन्नतीची थकबाकी आदी २० मागण्यांकरिता कर्मचारी संघटनेने १ जानेवारीपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचाच एक भाग असलेल्या काळी फित आंदोलनाला शनिवारी सुरूवात करण्यात आली. सोमवारी काळ्या फिती लावल्यानंतर पालिका कर्मचाºयांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली. यावेळी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर मंगळवारपासून सुरू होणाºया आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी न.प.कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनंत निळे, व महाराष्ट्र राज्य न.प.कर्मचारी संघटनेचे कार्यकारी सदस्य मोहन अहिर यांच्यासह पालिका कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
अत्यावश्यक सेवा होणार प्रभावित!
आपल्या विविध मागण्यांसाठी पालिका कर्मचाºयांनी १ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. त्याअनुषंगाने पालिका कर्मचाºयांनी २९ डिसेंबरपासून टप्प्या-टप्प्याने आंदोलनालाही सुरूवात केली आहे. मंगळवारपासून पालिका कर्मचारी संपावर गेल्यास पाणी पुरवठा, आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा प्रभावित होणार असल्याचे दिसून येते.