खरप बु. येथे विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:20 AM2021-05-06T04:20:07+5:302021-05-06T04:20:07+5:30

अकोला : शहरातील वाॅर्ड क्रमांक तीनमधील खरप बु. परिसरात विजेचा लपंडाव वाढला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास वीज पुरवठा खंडित ...

Kharap Bu. Lightning strikes here | खरप बु. येथे विजेचा लपंडाव

खरप बु. येथे विजेचा लपंडाव

Next

अकोला : शहरातील वाॅर्ड क्रमांक तीनमधील खरप बु. परिसरात विजेचा लपंडाव वाढला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्याने पशुपालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. याकडे महावितरणने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

----------------------------

हळद उत्पादक शेतकरी संकटात

पातूर : पारंपरिक पिकांना फाटा देत तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी हळद लागवड केली आहे; मात्र कंदकुज, करपा, धुक्यामुळे हळदीचे उत्पादन २० ते ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. याशिवाय किडींमुळे पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

---------------------------------------

जिल्ह्यात अद्रकाचे उत्पादन सरासरी!

अकोला : जिल्ह्यात अद्रक पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. योग्य मार्गदर्शन व नियोजनातून हळद लागवडीतून चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते; मात्र या पिकाचा प्रयोग करताना पहिल्यांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना सरासरी उत्पादन झाले आहे.

---------------------------------------

शहरातील बसस्थानकावरील गर्दी ओसरली!

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पंधरा दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मराठा आरक्षण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बसफेऱ्या रद्द केल्याने मध्यवर्तीय बसस्थानकावर गर्दी दिसून आली नाही.

---------------------------------

‘नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाई!’

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असतानाही नागरिक बेफिकिरीने वागत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानंतरही नागरिक रस्त्यांवर गर्दी करत आहेत. विनामास्क फिरत असल्याचे चित्र दिसत आहे.

------------------------------

खड्डा ठरतोय जीवघेणा

अकोला : सातव चौकात भला मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. हा खड्डा जीवघेणा ठरण्याची चिन्हे पाहता तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे. या मार्गाने नेहमी वर्दळ असते. त्यामुळे मोठी घटना घडण्याची शक्यता आहे.

---------------------------------------

राऊतवाडीत वाढले अतिक्रमण

अकोला : राऊतवाडी, जठारपेठ चौक आणि उमरी रोडवर भाजी विक्रेत्यांसह इतर किरकोळ व्यावसायिकांनी अतिक्रमण थाटल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.

------------------------------------

Web Title: Kharap Bu. Lightning strikes here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.