खरिपातील पीक कर्जवाटपाचे दर निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:18 AM2021-04-08T04:18:51+5:302021-04-08T04:18:51+5:30
दरवर्षी राज्य समितीद्वारा पीक कर्जवाटपाचे दर जाहीर केले जातात. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तांत्रिक समितीची बैठक होऊन आवश्यक ते ...
दरवर्षी राज्य समितीद्वारा पीक कर्जवाटपाचे दर जाहीर केले जातात. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तांत्रिक समितीची बैठक होऊन आवश्यक ते बदल केले जातात. जिल्ह्यात सन २०२१-२२ मध्ये खरीप पिके, बारमाही पिके, हंगामी पिके, फळपिके यांच्यासाठी प्रतिहेक्टरी पीक कर्जवाटपाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार यंदा सोयाबीनसाठी प्रतिहेक्टरी ४९ हजार रुपये, कापूस जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी ५२ हजार, तर बागायतीसाठी ६९ हजार रुपये, तुरीसाठी प्रतिहेक्टरी ३५ हजार रुपये जिरायतीसाठी, तर बागायतीसाठी ४० हजार रुपये दराने शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जाईल.
याशिवाय किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत खेळते भांडवली कर्जासाठीदेखील कर्जदार निश्चित केले आहे. यानुसार एक गाय पालनासाठी १२ हजार, १ म्हैस १४ हजार, शेळी, मेंढी पालनासाठी १० युनिटसाठी १२ हजार ५०० ते २० हजार, कुक्कुटपालनासाठी १०० पक्ष्यांचे युनिटमध्ये ब्रायलरला आठ हजार, लेयरला १५ हजार व गावठीला पाच हजार, मत्स्यपालनासाठी प्रतीहेक्टरी शेततळे सर्वजाती मत्स्यपालनाकरिता २.२० लाख असे राहतील.
--बॉक्स--
फळपीक व भाजीपाला पिकांचे दर
भाजीपाला पिकांसाठी मिरचीला हेक्टरी ७५ हजार, टोमॅटोला ८० हजार, कांद्याला ६५ हजार, हळदीला १ लाख ५ हजार, कोबी ४२ हजार, फूल पिकांना ३६ ते ४७ हजार, केळीसाठी १ लाख, संत्र्याला ८८ हजार, चारा पिकांमध्ये मका ३२ हजार, बाजरी १६ हजार व ज्वारीला हेक्टरी २२ हजार रुपये कर्जवाटपाची दर निश्चिती राज्य समितीद्वारा करण्यात आलेली आहे.
--बॉक्स--
खरिपासाठी हेक्टरी दर
सोयाबीन
४९,०००
तूर
३५,०००
मूग
२०,०००
उडीद
२०,०००
कापूस
५२,०००
मका
३०,०००