शेतकऱ्यांची खरीप पूर्व कामांसाठी लगबग वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:19 AM2021-04-20T04:19:05+5:302021-04-20T04:19:05+5:30

जेमतेम दीड महिन्याचा कालावधी खरीप हंगाम सुरू होण्यासाठी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी सध्या जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी शेणखत टाकण्याचे ...

The kharif of the farmers almost increased for pre-work | शेतकऱ्यांची खरीप पूर्व कामांसाठी लगबग वाढली

शेतकऱ्यांची खरीप पूर्व कामांसाठी लगबग वाढली

Next

जेमतेम दीड महिन्याचा कालावधी खरीप हंगाम सुरू होण्यासाठी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी सध्या जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी शेणखत टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी काही शेतकरी पहाटेपासून बैलगाडीने शेणखत घेऊन जात असतात तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतातील भात खाचरात शेणखताचे ढिगारे टाकून ठेवत आहेत तर काही शेतकरी शेतातील निरुपयोगी केरकचरा जाळून जमिनीची साफसफाई करीत आहेत. या कामासाठी दोन पाळीत काम करताना दिसून येत आहेत. सध्या वातावरण चांगले दिसून येत असल्याने शेतकरी सूर्य मध्यावर येईपर्यंत शेतात काम करताना दिसून येत आहेत.

दरवर्षी शेतकरी शेतातील पाऱ्या धुऱ्याचे मातीकाम करून शेतजमीन चांगली करीत असतात. सध्या शेतात मातीकाम करताना दिसून येत आहेत. यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. यासाठी प्रति तास ५०० ते ६०० रुपये टॅक्टर मालक घेत आहेत. त्यामुळे त्यांना हंगामी स्वरूपात गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या सगळीकडे कोरोनाची चिंता असताना बळीराजा मात्र सर्व चिंता बाजूला सारून शेतातील कामे करण्यात मग्न झालेला दिसून येत आहे. शहरी भागातही ट्रॅक्टरच्या सहाय्याने अनेक शेतकरी आता जमीन सपाटीकरणाचे काम हाती घेतले आहे.

फोटो: मेल फोटाेत

यंदा समाधानकारक पावसाची शक्यता

शेतकरी दरवर्षी शेतातील कामे ठरलेल्या वेळेच्या आत करून पावसाची वाट बघत असतात. यावर्षी कोरोना या अभूतपूर्व संकटातही स्कायमेंट या हवामान अंदाजानुसार समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. जिल्ह्यातील शेती पाण्यावर अवलंबून आहे त्यामुळे शेतकरी दरवर्षी चांगल्या पावसाची आस धरून असतात मात्र निसर्ग कधी शेतकऱ्यांना ऐन हंगामात हुलकावणी देत असतो तरी शेतकरी शेतातून पीक येईल ही आशा बाळगत पीक लागवड करीत असतो. गतवर्षी शेतकऱ्यांना उत्पादन घटीचा जबर फटका बसला मात्र यातून सावरत कसा बसा पुन्हा नव्या उमेदीने शेतातील कामे करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.

Web Title: The kharif of the farmers almost increased for pre-work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.