खरीप हंगामपूर्व ऑनलाईन मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:31 AM2021-05-05T04:31:29+5:302021-05-05T04:31:29+5:30

पाणीकर वसुलीसाठी ग्रामपंचायतची मोहीम आगर : येथे पाणीकर वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाकडून ४ मे ...

Kharif pre-season online guide | खरीप हंगामपूर्व ऑनलाईन मार्गदर्शन

खरीप हंगामपूर्व ऑनलाईन मार्गदर्शन

Next

पाणीकर वसुलीसाठी ग्रामपंचायतची मोहीम

आगर : येथे पाणीकर वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाकडून ४ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयाने मोहीम राबविली. आगरसह परिसरातील कंचनपूर, बादलापूर, पाळोदी, गोत्रा आदी गावांत खांबोरा ६४ खेडी योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येतो. नळ धारकांकडे मोठ्या प्रमाणात पाणी कर थकीत असल्याने, ग्रामपंचायतने मोहीम राबविली. गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना सूचना देण्यात आली. मोहिमेला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला.

ग्रामसेवक संघटनेचे खंडारे सेवानिवृत्त

निहिदा : बार्शीटाकळी तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुधाकरराव गोविंदराव खंडारे हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांना एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये त्यांचा बीडीओ किशोर काळबांडे, सभापती प्रकाश वाहूरवाघ यांनी सत्कार केला. यावेळी सहायक गट विकास अधिकारी रमेश चव्हाण, महेंद्र बोचरे, प्रशांत क्षीरसागर, डी. आर. वानखडे, भारत भोंबळे, बिचारे, संदीप काकड, चैतन्य खुमकर, योगेश कापकर, मनोज गवई, प्रमोद कवळे उपस्थित होते.

Web Title: Kharif pre-season online guide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.