जिल्ह्यात ४.७१ लाख हेक्टरमध्ये होणार खरिपाची पेरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:23 AM2021-04-30T04:23:28+5:302021-04-30T04:23:28+5:30
पावसाळा सुरू होण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज आहे. या काळात खरिपाच्या ...
पावसाळा सुरू होण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज आहे. या काळात खरिपाच्या पेरण्या होतात. त्यामुळे आधी नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा किती क्षेत्रावर पेरण्या होतील याचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार खते व बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. खते व बियाण्यांची कमतरता भासणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे.
जिल्ह्यातील खरिपासाठी या हंगामात २ लाख १२ हजार ७०० हेक्टरवर सोयाबीनचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक क्षेत्रफळात उत्पादन घेण्यात येणार आहे. तर तूर पिकासाठी ५१ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन केले आहे. मूग ३५ हजार १५०, उडीद १६ हजार १२५ क्षेत्रात पेरणीचे नियोजन आहे. या वर्षी तूर व सोयाबीनला चांगला दर मिळाला. त्यामुळे यंदाच्या खरिपात सोयाबीन व तूर पिकाचे क्षेत्र वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊन यंदा हे क्षेत्र वाढविण्यात आले आहे.
--बॉक्स--
जिल्ह्यात पीकनिहाय अशी होणार लागवड
कापूस
१,४७,०००
सोयाबीन
२,१२,७००
तूर
५१,२००
--बॉक्स--
१.६८ लाख क्विंटलवर बियाणे लागणार!
यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात १ लाख ६८ हजार १५८.२ क्विंटल बियाण्यांची आवश्यक्ता भासणार आहे. यामध्ये सोयाबीन वगळता महाबीजच्या २ हजार ७१९ बियाण्यांची मागणी होणार आहे. राज्य बियाणे मंडळाकडून २५८ क्विंटल, खासगीमधून ५ हजार ६५६.२ क्विंटलवर बियाणे मिळणार आहे.