मूर्तिजापूर तालुक्यात खरीप पेरणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 06:55 PM2021-06-16T18:55:28+5:302021-06-16T18:55:42+5:30

Kharif sowing begins in Murtijapur taluka : पेरणी योग्य पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे.

Kharif sowing begins in Murtijapur taluka | मूर्तिजापूर तालुक्यात खरीप पेरणीला सुरूवात

मूर्तिजापूर तालुक्यात खरीप पेरणीला सुरूवात

Next

- संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यात आठवडाभरात अनेक ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे. दरम्यान तालुक्यात मुबलक खत उपलब्ध असले तरी महाबीज बियाण्याचा प्रचंड तुटलडा मात्र तुटवडा जाणवत आहे.
        तालुक्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला असला तरी तालुक्यातील काही भागातच पेरणी योग्य पाऊस झाला आहे. या भागात शेतकरी खरीप पेरणीसाठी सरसावले आहेत. मूर्तिजापूर, कुरुम, शेलू बाजार मंडळात आतापर्यंत ७५ मिलीमीटर च्या वर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेती मशागत तातडीने आटोपून पेरणीला सुरुवात केली असली तरी संपूर्ण तालुक्यात आतापर्यंत केवळ ६८ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. आवश्यकते नुसार संपूर्ण तालुक्यासाठी ३ हजार ५०० क्विंटल महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात आली होती परंतु ३ हजार १०० क्विंटल महाबीज बियाणे पुरविण्यात आले असल्याने प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तर खासगी कंपनीच्या ८ हजार ८०० क्विंटल मागणी नुसार पुर्तता झाली असली तरी बाजारात सद्यस्थितीत तोकड्या प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. भविष्यात महाबीज बियाणे बाजारात उपलब्ध होण्याची आशा मावळली असल्याने शेतकऱ्यांनी घरचे बियाणे उगवण शक्ती प्रक्रीया तपासून घेऊन व बिज प्रक्रीया करुन बियाणे वापण्याचा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे. सद्यस्थितीत बाजारात महाबीज वगळता इतर कंपन्यांचे सोयाबीन बियाणे केवळ ६०० क्विंटल बतियाने बाजारात उपलब्ध आहे. पिकांसाठी आवश्यक असलेले सर्व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांची खताची चिंता मिटली आहे. हल्ली  कुठलेही खत उपलब्ध आहे. एकूण ३ हजार टन खतसाठा आजमितीस आहे. तर त्या डीएपी ३७५ मेट्रिक टन असल्याने शेतकऱ्यांची खतांची चिंता मिटली असली तरी महाबीजचे बियाणे १२ टक्केच उपलब्ध झाल्याने व इतर बियाण्यांच्या किंमती पेक्षा स्वस्त असल्याने महाबीज बियाण्याची वाणवा होत आहे.

Web Title: Kharif sowing begins in Murtijapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.