खरीप पेरणी तोंडावर; पण मिळाला नाही पीक विमा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 05:24 PM2019-06-18T17:24:48+5:302019-06-18T17:26:13+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली असली तरी, पीक विमा रकमेचा लाभ शेतकºयांना मिळाला नाही.
- संतोष येलकर
अकोला: गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या शेतकºयांना पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली असली तरी, पीक विमा रकमेचा लाभ शेतकºयांना मिळाला नाही. अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकºयांनी पीक विमा काढला. कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी इत्यादी खरीप पिकांचा विमा काढण्यात आला आला. विमा हप्त्याची रक्कम (प्रीमियम) संबंधित बँकांमध्ये जमा करून शेतकºयांनी पीक विमा काढला. पीक विमा योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकºयांसाठी संबंधित विमा कंपनीकडून पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली; मात्र शेतकºयांच्या बँक खात्यात अद्यापही पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली नाही. पावसाळा सुरू होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला. खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, अकोला, बुलडाणा, वाशिमसह इतर जिल्ह्यातही शेतकºयांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली नाही. दुष्काळी परिस्थितीत आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना गतवर्षी काढलेल्या पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याने, खरीप पेरणीचा खर्च भागविणार कसा, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने पीक विम्याची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला.
विमा कंपनी कार्यालयाकडे माहितीच नाही !
गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक व महसूल मंडळनिहाय पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. यासंदर्भात आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीच्या अकोल्यातील जिल्हा कार्यालयाशी सोमवारी संपर्क साधला असता, जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकºयांसाठी तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांकरिता महसूल मंडळनिहाय पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली; मात्र जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक विम्याची किती रक्कम मंजूर करण्यात आली, यासंदर्भात माहिती उपलब्ध नसल्याचे विमा कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात किती शेतकºयांसाठी पीक विम्याची किती रक्कम मंजूर करण्यात आली, यासंदर्भात आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीच्या जिल्हा शाखा कार्यालयाकडून माहिती मागितली आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर मंजूर पीक विम्याची रक्कम आठ दिवसांत जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात करण्यात येणार आहे.
- आलोक तारेणिया
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक