खरीप पेरणी अंतिम टप्प्यात तरीही पीक कर्ज वाटप केवळ ६८ टक्क्यांवर
By रवी दामोदर | Published: July 17, 2023 04:46 PM2023-07-17T16:46:52+5:302023-07-17T16:47:19+5:30
यंदा खरीप हंगामात पीक कर्जासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार ९५० शेतकऱ्यांपैकी १५ जुलैच्या अखेर ८३ हजार ७६९ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असून, यापोटी ८६७ कोटी ७८ लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे.
अकोला : जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरू असून, बळीराजा व्यस्त आहे. काही शेतकरी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी बँकांच्या चकरा मारीत आहेत. खरीप हंगामाची पेरणी ८० टक्क्यांवर पोहोचली असून सुद्धा लक्ष्याकांपैकी केवळ ६८ टक्केच पीक कर्जाचे वितरण झाले आहे. आगामी दिवसात पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे.
यंदा खरीप हंगामात पीक कर्जासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार ९५० शेतकऱ्यांपैकी १५ जुलैच्या अखेर ८३ हजार ७६९ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असून, यापोटी ८६७ कोटी ७८ लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे. यावर्षी जिल्ह्याला १ हजार २७५ कोटी रुपयांचे लक्ष्यांक असून, आतापर्यंत पीक कर्ज वाटपाची टक्केवारी ६८.६ टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरू आहे. यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशीला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी आर्थिक अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचा आधार असतो. पेरणी अंतिम टप्यात पोहोचली असताना केवळ ६८ टक्के पीक कर्जाचे वितरण झाल्याचे चित्र आहे.
असे झाले पीक कर्जाचे वितरण
बँका शेतकरी (संख्या) वितरण ( लाखात रुपये)
व्यापारी बँका १७,६१५ १९,०९०
खासगी बँका १,३०२ २,०८१
व्हीकेजीबी १२,९९३ १४,९२६
डीसीसीबी ५१,८५९ ५०,६८१