खारपाणपट्टय़ातील सिंचन प्रकल्प रखडलेलेच!

By admin | Published: March 13, 2017 02:39 AM2017-03-13T02:39:06+5:302017-03-13T02:39:06+5:30

नेरधामणा, उमा बॅरेजचे कामही थंडबस्त्यात!

Kharpanchayat irrigation project is ready! | खारपाणपट्टय़ातील सिंचन प्रकल्प रखडलेलेच!

खारपाणपट्टय़ातील सिंचन प्रकल्प रखडलेलेच!

Next

अकोला, दि. १२- जिल्हय़ातील शापित खारपाणपट्टय़ात सिंचन प्रकल्पाची कामे रखडली आहेत. नेर-धामणा, उमा, काटेपूर्णासह सर्वच बॅरेजची कामे ठप्प पडली आहेत. सातत्याने खारेपाणी व पावसाच्या अनिश्‍चिततेचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना या बॅरेजमुळे दिलासा वाटत होता; पण कामेच बंद पडल्याने शेतकर्‍यांचे लक्ष या बांधकामाकडे लागले आहे.
खारपाणपट्टय़ातील पाणी समुद्राच्या पाण्यासारखे खारे आहे. आरोग्यासाठी घातक असलेले हे पाणी पिकांवर परिणाम करणारे असल्याने या भागात धरणं व्हावीत, असे सातत्याने प्रयत्न झाले; पण या भागातील भूगर्भात ४0 ते ५0 मीटर खाली खडक नसल्याने धरण होऊ शकत नाही, असे सात त्याने जलसंपदा विभागाच्या विविध तज्ज्ञ समित्यांकडून सांगण्यात येत हो ते. यावर उपाय म्हणून नवीन तंत्रज्ञान वापरण्याचे ठरले. सुरुवातीला नेरधामणा बॅरेजचे काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आल्या. अखेर येथील कंत्राटदाराकडून या बॅरेजच्या कामाची मागील सात वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. खारपाणपट्टय़ातील पहिले बॅरेज आहे, जे डायफाम वॉलवर उभे करण्यात आले.
सध्या या बॅरेजचे काम थंडबस्त्यात पडले आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात येणार्‍या नेरधामणा बॅरेजनंतर खारपाणपट्टय़ात बॅरेजची शृंखला तयार करण्यात आली आहे.
अकोला जिल्हय़ातील बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा बॅरेज, नेरधामणा (पूर्णा-२) बॅरेज आहे. या बॅरेजला लागूनच मूर्तिजापूूर तालुक्यात घुंगशी बॅरेज आहे. या बॅरजेच्यावर काटेपूर्णा बॅरेज काटेपूर्णा नदीवर होणार आहे. लागनूच उमा बॅरेज आहे.
या बॅरेजच्यावर अमरावती जिल्ह्यात पूर्णा बॅरेज आहे. या सर्व बॅरेजचे काम थंडबस्त्यात आहे. या शृंखलेत काटीपाटीच्या बॅरेजचे काम रखडले आहे. बॅरेज झाल्यास ८.२४ दलघमी जलसाठा संकलित होईल, तसेच १८00 हेक्टर क्षेत्रावर सिंचन होईल.
काटीपाटी बॅरेजची किंमत वाढली!
शृंखलेला पूर्ण करणार्‍या काटीपाटी बॅरेजचे काम रखडले आहे. काटी पाटीची व्यवहार्यता तपासून काम सुरू करावे, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दोनदा दिलेला आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने या शृंखलेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिमाणी, काटीपाटी प्रकल्पाची किंमत सातत्याने वाढत असून, ६५ कोटींचे हे बॅरेज आता ३२५ कोटींचे झाले आहे.
 

Web Title: Kharpanchayat irrigation project is ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.