खेर्डा खुर्दला ३२ लाखांचा पुरस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 02:23 AM2017-08-07T02:23:20+5:302017-08-07T02:23:39+5:30

बार्शीटाकळी तालुक्यातून मिळविला प्रथम क्रमांक

khdera receieved water cup prize | खेर्डा खुर्दला ३२ लाखांचा पुरस्कार!

खेर्डा खुर्दला ३२ लाखांचा पुरस्कार!

Next
ठळक मुद्देवॉटर कप

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जलसंधारणासाठी ग्रामस्थांचा सहभाग वाढावा, यासाठी अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्यावतीने वॉटर कप ही स्पर्धा राबवण्यात आली होती. या स्पर्धेत  खेर्डा खुर्द गावाने बार्शीटाकळी तालुक्यातून प्रथम पुरस्कार पटकावला आहे. या गावातील ग्रामस्थांची चिकाटी पाहून आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांनी पुरस्कार रकमेची घोषणा केली आहे. त्यामुळे या गावाला तब्बल ३२ लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या अकोट तालुक्यातून जितापूर नाकटने, तर पातूर तालुक्यातून पांगरताटी या गावाने प्रथम पुरस्कार पटकावला. अभिनेता आमिर खान यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू केली आहेत. जलसंधारणाच्या कामात लोकांचा सहभाग वाढावा, यासाठी वॉटर कप ही स्पर्धा सुरू करून राज्य तसेच तालुका स्तरावर पुरस्कारांची घोषणा केली होती. या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातून बार्शीटाकळी, अकोट आणि पातूर या तालुक्यातील गावांनी सहभाग घेतला
होता. या स्पर्धेचा निकाल ६ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातून प्रथम पुरस्कार खेर्डा खुर्द या गावाने पटकावला. या गावाला पाणी फाउंडेशनच्यावतीने १० लाख रुपये, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आठ लाख रुपये मिळणार आहेत, तसेच ग्रामस्थांची चिकाटी पाहून आमदार हरीश पिंपळे यांनी १० लाख तर जिल्हा परिषद सदस्य अक्षय लहाने यांनी चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे या गावाला ३२ लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. बार्शीटाकळी तालुक्यातून द्वितीय क्रमांक सरावने पटकावला, तर तिसरा क्रमांक हातोला गावाला मिळाला. दुसºया क्रमांकासाठी ७.५ लाख, तर तिसºया क्रमांकाला पाच लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. अकोट तालुक्यातून प्रथम पुरस्कार जितापूर नाकटने पटकावला. या गावाला १० लाख रुपये पाणी फाउंडेशन व आठ लाख रुपये महाराष्ट्र शासनाच्यावतीने मिळणार आहेत. तालुक्यातून दुसरा क्रमांक मिर्झापूर, तर तिसरा क्रमांक उमरा या गावाने पटकावला. पातूर तालुक्यातून प्रथम पुरस्कार पांगरताटी या गावाने पटकावला, तर द्वितीय क्रमांक शिर्ला व तिसरा क्रमांक चारमोळी या गावाने पटकावला. त्यांना अनुक्रमे १८ लाख, ७.५ लाख आणि पाचलाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. जलसंधारणाठी ग्रामस्थांनी केलेल्या परिश्रमामुळे गावांना लाखो रुपयांचे पुरस्कार मिळाले आहेत.

Web Title: khdera receieved water cup prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.