खरिपाच्या कर्जासाठी मुदत संपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:37 AM2017-10-23T01:37:43+5:302017-10-23T01:38:02+5:30

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना  म्हणून सुरू केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी कधी नव्हे एवढा  कालापव्यय करत गरजू शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ तर  सोडाच पीक कर्ज मिळण्यापासूनही वंचित राहण्याची वेळ  शासनाने आणली. खरिपाच्या पेरणीसाठी दहा हजारांची मदत  नाही, त्यातच मुदतीत कर्जमाफी न झाल्याने ३0 सप्टेंबरनंतर  खरिप हंगामासाठी पीक कर्ज देताना आता बँका हात वर करत  आहेत. या प्रकाराने शेतकर्‍यांना कर्जमाफीबद्दल हसावे की  रडावे, हेच सुचेनासे झाले आहे.

Khiri's loan expired! | खरिपाच्या कर्जासाठी मुदत संपली!

खरिपाच्या कर्जासाठी मुदत संपली!

Next
ठळक मुद्दे कर्जमाफीच्या याद्या आजपासून दिसण्याची शक्यता

सदानंद सिरसाट । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना  म्हणून सुरू केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी कधी नव्हे एवढा  कालापव्यय करत गरजू शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ तर  सोडाच पीक कर्ज मिळण्यापासूनही वंचित राहण्याची वेळ  शासनाने आणली. खरिपाच्या पेरणीसाठी दहा हजारांची मदत  नाही, त्यातच मुदतीत कर्जमाफी न झाल्याने ३0 सप्टेंबरनंतर  खरिप हंगामासाठी पीक कर्ज देताना आता बँका हात वर करत  आहेत. या प्रकाराने शेतकर्‍यांना कर्जमाफीबद्दल हसावे की  रडावे, हेच सुचेनासे झाले आहे.
दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे  सांगत शासनाने त्यांच्याकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले.  त्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतरही दिवाळी पूर्वी म्हणजे, १९ ऑक्टोबरपर्यंत शेतकर्‍यांना प्रत्यक्ष  कर्जमाफीचा लाभ देण्यात शासन अपयशी ठरले आहे. या  प्रकाराने कर्जमाफी आणि त्या आधारे मिळणार्‍या खरीप पीक  कर्जाच्या भरवशावर बसलेल्या शेतकर्‍यांची तर क्रूर थट्टा त्या तून झाली आहे. विशेष म्हणजे, कर्जमाफीचा लाभ देण्यापूर्वी शे तकर्‍यांना खरीप हंगामात पेरणीसाठी मदत म्हणून दहा हजार रु पये कर्ज बँकांकडून दिले जातील, असेही ठरले होते. त्याबाबत  माहिती घेतली असता जिल्हय़ात २ लाख ७९ हजार शेतकरी  खातेदारांपैकी केवळ २४६ खातेदारांना ती मदत मिळाली, हे  विशेष. त्यातच अल्प पावसामुळे उडीद, मूग, सोयाबीन पीक हा तचे गेले. 
काही भागात अल्प प्रमाणात आलेले पीक परतीच्या पावसाने मा तीत मिसळले. त्यामुळे लाखो शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरणीसाठी  केलेल्या खर्चाची तोंडमिळवणी करणे जिकिरीचे झाले आहे.  त्यातून शेतकरी कमालीचा त्रस्त झाला आहे. त्यातच खरिपाचे  पीक कर्ज मिळणार नसल्याचे बँकांनी स्पष्ट केले आहे.  शासनाने चालवलेल्या या थट्टेने तर आता गर्भगळित होण्याची  वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. 

पात्र लाभार्थी यादीच तयार नाही!
शासनाने नमुन्यादाखल कर्जमाफी केलेल्या शेतकर्‍यांना प्रमाण पत्र दिवाळीपूर्वी वाटप केले. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ  मिळालेला नाही. आता १५ नोव्हेंबरपर्यंत लाभ मिळेल, असे  सांगितले जात आहे. त्याचा खरिपाच्या पीक कर्जासाठी कोणताच  फायदा नाही. 
कोरडवाहू भागातील ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन, मूग, उडिदाची  पेरणी केली. त्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्या शेतकर्‍यांना  कर्जमाफीचा लाभ मिळून खरिपाचे कर्ज मिळण्याची अपेक्षा हो ती; मात्र शासनाच्या उपद्व्यापाने तेही शेतकर्‍यांना मिळणार  नाही, हे निश्‍चित झाले आहे. 


बँकांचे कर्जवाटपाच्या मुदतीकडे बोट
खरीप हंगामाचे पीक कर्ज वाटप ३0 सप्टेंबर तर रब्बी  हंगामसाठी ३१ जानेवारीपर्यंत केले जाते. खरिपाची मुदत  केव्हाची संपल्याने ते कर्ज वाटप होणारच नाही, अशी भूमिका  बँकांनी घेतली आहे. तर रब्बीसाठी मागणी करणार्‍यांना ३0 जून पर्यंत परतफेडीच्या अटीवर कर्ज दिले जाणार आहे. 

लाभार्थी याद्या दिसणार, पात्रता नंतर ठरणार
कर्जमाफी योजनेच्या तत्त्वत: आणि निकषानुसार काही  लाभासाठी पात्र ठरणार्‍या खातेदारांच्या याद्या उद्या सोमवार  सायंकाळपर्यंत ऑनलाइन दिसण्याची शक्यता आहे; मात्र त्यांना  मिळणारा लाभ नेमका कोणता असेल, हे १५ नोव्हेंबरनंतरच  समजणार आहे. 

१ लाख ३८ हजार अर्जदारांनाच मिळेल लाभ
जिल्हय़ात कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी असलेली खात्यांची  संख्या १ लाख ९१ हजार दिसत असली तरी त्यासाठी ज्या १  लाख ३८ हजार ९६२ शेतकर्‍यांनी अर्ज केले, त्यांनाच लाभ  मिळणार आहे. अर्जदारांचे एकापेक्षा अधिक खाते असल्याने  लाभार्थी संख्या फुगलेली दिसत आहे.

मोठय़ा शेतकर्‍यांचा झाला ‘गेम’
कर्जमाफी पात्र लाभार्थींमध्ये स्त्री शेतकर्‍यांचा प्राधान्य गट आहे.  त्यानंतर नियमित कर्ज घेऊन मुदतीत परतफेड करतात, त्यांना  प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्यानंतर ३0 जून २0१६  अखेरपर्यंत १ लाख ५0 हजारांपेक्षा कमी रक्कम थकीत  असलेल्या खातेदारांना माफीचा लाभ मिळेल. त्यानंतर १ लाख  ५0 हजारांपेक्षा जास्त रक्कम थकीत असलेल्या शेतकर्‍यांना  अधिकची रक्कम बँकेत भरणा केल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ  मिळण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. त्या गटात  असलेले शेतकरी मोठे आहेत. त्यांना योजनेचा लाभ मिळतो की  नाही, हाच मोठा प्रश्न आता निर्माण होत आहे. 

Web Title: Khiri's loan expired!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी