खिरकर यांचा तडीपार प्रस्ताव खारीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:18 AM2021-04-18T04:18:47+5:302021-04-18T04:18:47+5:30
----------------------------- निंबा फाटा परिसरात वृक्षांची कत्तल कवठा : शासनामार्फत दरवर्षी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ मोहीम राबविली जाते. मात्र ...
-----------------------------
निंबा फाटा परिसरात वृक्षांची कत्तल
कवठा : शासनामार्फत दरवर्षी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ मोहीम राबविली जाते. मात्र निंबा फाटा परिसरात अवैध वृक्षतोड वाढली असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक सुरू असल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-----------------------
शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत
वरूर जऊळका : खारपाणपट्ट्यातील वरूर जऊळका, खापरवाडी, लोतखेड आदी गावांतील शेतकऱ्यांनी सन २०२० ते २०२१ च्या खरीप हंगामात पीक विम्याची रक्कम भरली होती. पिकांचे नुकसान झाल्यानंतरही पीक विमा मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
--------------------
पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची गावाकडे धाव!
बोरगावमंजू : परिसरातील विंधन विहिरी, तलाव आटल्याने वन्यप्राण्यांची भटकंती होत आहे. काही वन्यप्राण्यांनी गावाकडे धाव घेऊन धुडगूस घातला. बोरगावमंजू येथे माकडांनी हैदोस घातला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------------------------------
देवरी फाटानजीक व्हॉल्व्हला गळती
रोहणखेड : ८४ खेडी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अकोट-अकोला मार्गाने ग्रामीण भागासाठी जलवाहिनी टाकली आहे. या मार्गावरील देवरी फाटानजीक व्हॉल्व्हला गळती लागली असून, पाण्याची नासाडी होत आहे. दुसरीकडे रोहणखेड परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
----------------------------------------------
ॲाटोचालकांवर उपासमारीची वेळ
बाळापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सद्यस्थितीत ऑटोचालकांना प्रवासी मिळत नसल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटलेलीच आहे.
-------------------------------------------
क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक
चोहोट्टा बाजार : अकोट-अकोला मार्गावर अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. परिसरात अनेक अवैध प्रवासी वाहने प्रवाशांना कोंबून बसवितात. त्यामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहतूक रोखण्याची आवश्यकता आहे.
-----------------------------------------
अकोट येथे आणखी १६ पॉझिटिव्ह
अकोट : तालुक्यासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार अकोट तालुक्यात आणखी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.