खिरपुरी बु. येथील ग्रामस्थांची तहसील कार्यालयात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:24 AM2021-09-09T04:24:37+5:302021-09-09T04:24:37+5:30
खिरपुरी बु : बाळापूर तालुक्यात गत दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. खिरपुरी बु. परिसरात दि.७ सप्टेंबर रोजी ...
खिरपुरी बु : बाळापूर तालुक्यात गत दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. खिरपुरी बु. परिसरात दि.७ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाल्याने नाल्याला पूर आला होता. पुराचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. याबाबत सर्व्हे करून ग्रामस्थांना त्वरित मदत करण्याची मागणी करीत खिरपुरी येथील ग्रामस्थांनी बाळापूर येथील तहसील कार्यालयात धडक देत आक्रोश मोर्चा काढला. तसेच ग्रामस्थांनी विविध मागण्याचे तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार, जुलै महिन्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गावकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. नुकसानग्रस्तांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर प्रदीप रमेश पातोडे, ज्ञानेश्वर कवडकार, राधाकृष्ण दांदळे, विकास प्रकाश शिरसाट, सागर सारंगधर पातोडे, अक्षय शिरसाट, संतोष शिरसाठ, प्रकाश कृष्णाजी वानखडे, रामेश्वर गुलाबराव घाटोळ, बालुशा मेहताब शहा, राष्ट्रपाल जनार्दन शिरसाट, गणेश रमेश शिरसाट, करीम मैकशा, गोपाल विठ्ठल काळपांडे, भगवान शिवचरण शिरसाट, हिंमत येवले, सुधाकर, गजानन पातोडे, नीलेश पातोडे, मोतीराम पवार, सुरेश वारके, विठ्ठल उपळवटे, विष्णू सोळंके, गजानन दांदळे, ओम शर्मा, सागर शिरसाट, सुनील वाकोडे, अरविंद पवार, नितेश हिवराळे, ज्ञानेश्वर गधाड, सकाराम वारके व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुक्माबाई सुरेश कावडकार, सुभद्राबाई पातोडे, सविताबाई शालिग्राम कावडकार, सुशीलाबाई सुखदेव पवार, मैनाबाई गोपनारायण, संगीताबाई राष्ट्रपाल शिरसाट, सिंधूबाई जाडल, बेबीबाई पातोडे, रेखाबाई वसंता तायडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.