कोरोनामुळे होतेय किडनीचे नुकसान, लक्षणांकडे लक्ष द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:14 AM2021-06-17T04:14:07+5:302021-06-17T04:14:07+5:30
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास... कोरोनाचा विषाणू किडनीवर थेट संसर्ग होतो. त्यामुळे रक्त प्रवाहात गुठळ्या तयार होतात आणि या गुठळ्यांमुळे ...
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास...
कोरोनाचा विषाणू किडनीवर थेट संसर्ग होतो. त्यामुळे रक्त प्रवाहात गुठळ्या तयार होतात आणि या गुठळ्यांमुळे रक्त वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.
किडनीचे कार्य सुरळीत होत नाही. किडनीच्या सेलमध्ये कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
किडनीच्या आजारावर आता मोठ्या प्रमाणावर उपचार उपलब्ध आहेत. काही साध्या व सोप्या चाचण्यांच्या आधारे हे आजार ओळखून त्यावर उपचार शक्य आहेत.
त्यामुळे आजाराचे निदान करून त्वरित उपचार करण्यासाठी रुग्णाला लवकर किडनी तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जाणे गरजेचे असते.
फॅमिली डॉक्टरांशी बोलूनच घ्या स्टेरॉईड
किडनीचा आजार असलेल्या रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्यास अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. औषधे घेताना फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधने आवश्यक आहे.
कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी स्टेरॉईड औषधे आवश्यक आहेत, परंतु ही औषधे घेतल्याने किडनीवर अधिक परिणाम होण्याची भीती असते.
स्टेरॉईडमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी, तसेच अँटिबायोटिक औषधे घेण्यासाठी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
कोरोना संसर्गावर उपचार घेत असतानाही डॉक्टरांनी सुचविलेली औषधे त्यांनी ठरवून दिलेले प्रमाण आणि वेळेनुसार घेणे अत्यावश्यक आहे.
हे करा
किडनीचा आजार टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करावी.
भरपूर पाणी प्यावे.
आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा.
रक्तदाब-मधुमेह असल्यास अधिक काळजी घ्या.
ठराविक अंतराने लघवी-रक्त तपासावे.
हे करू नये
किडनीचा आजार असताना वेदनाशामक औषधे घेऊ नका.
फास्ट फूडचे सेवन टाळा.
धूम्रपान आणि मद्यपान करू नये.
स्वत:हून कुठलीही औषधे घेणे टाळा.
कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर स्टेरॉईड आणि अँटिबायोटिक औषधांचा अति किंवा अनावश्यक वापरामुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो. तसेच आधीच किडनीचा आजार असलेल्या काही रुग्णांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. योग्य काळजी आणि उपचारानंतर यातील ९९ टक्के रुग्ण बरेही झाले आहेत.
- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, वैद्यकीय अधिकारी, जीएमसी, अकोला