क्राइम मिटिंगमध्ये ‘रॉकेल प्रकरण’ पेटले!
By Admin | Published: September 29, 2016 01:54 AM2016-09-29T01:54:24+5:302016-09-29T01:54:24+5:30
पोलीस अधीक्षक मीणा यांनी केली अधिकार्यांची कानउघाडणी.
अकोला, दि. २८- इंधन टाकीमध्ये डीझलऐवजी रॉकेल असलेला ट्रक आकोट पोलिसांनी ५0 हजार रुपये घेऊन सोडल्याचे खळबळजनक प्रकरण एका ह्यकॉल रेकॉडिर्ंगह्णमुळे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा ह्यलोकमतह्णने मंगळवारी पर्दाफाश केला. त्यानंतर लगेच बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी गुन्हे आढावा बैठक घेऊन संबंधित पोलीस अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
आकोट शहरातील जीवन टायर्स नामक दुकानासमोर एम एच ४0 एके ४७५0 क्रमांकाच्या ट्रकचे टायर बदलण्याचे काम सुरू होते. नेमके त्याचवेळी आकोट शहर पोलीस स्टेशनमधील काही पोलीस कर्मचार्यांनी त्या ट्रकची झडती घेऊन, डीझल टॅँकमध्ये रॉकेल असल्याच्या संशयावरून ट्रक ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणला. दुपारच्या सुमारास ट्रक पोलीस स्टेशनमध्ये लावल्यानंतर दिवसभर हा ट्रक ठाण्यातच उभा ठेवून कोणतीही कारवाई न करता ५0 हजार रुपये घेऊन सोडून दिला. या ट्रकमध्ये टाकण्यासाठी आकोटातील बड्या रॉकेल माफियाकडून रॉकेल घेण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी सदर रॉकेल माफियाला ट्रक पकडल्यासंदर्भात एका व्यक्तीने विचारणा केली असता, या रॉकेल माफियाने हप्ते दिल्यावरही पोलिसांनी ट्रक पकडल्याचा आरोप रेकॉडीर्ंगमध्ये केला आहे. हा ट्रक सोडण्यासाठी सदर रॉकेल माफियालाच ५0 हजार रुपये द्यावे लागल्याने त्याने पोलिसांच्या या डबल हप्तेखोरीवर प्रचंड संताप व्यक्त केला होता. लोकमतने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्यानंतर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
आकोट एसडीपीओंनी केली चौकशी
रॉकेलचा ट्रक पैसे घेऊन सोडलेल्या प्रकाराची आकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे यांनी चौकशी केल्याची माहिती आहे. मनवरे यांनी एक हेड काँस्टेबल व तीन पोलीस कर्मचार्यांना बुधवारी याबाबत विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकही गुरुवारी आकोटमध्ये दाखल होऊन चौकशी करणार असल्याची माहिती आहे.
असा व्हावा तपास!
रॉकेल माफियाने केलेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी ही क्लिप फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात यावी, त्यानंतर संभाषण झालेल्या दोन्ही व्यक्तींचे कॉल डाटा रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यात यावे, तसेच दोन्ही व्यक्तींच्या आवाजाचे नमुने घेऊन त्याचीही फॉरेन्सिक लॅबकडे तपासणी केल्यास या प्रकरणातील सत्यता समोर येईल. यासाठी पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणाची अशा अनुषंगाने चौकशी केल्यास प्रकरणातील सत्यता समोर येणार असल्याची माहिती ज्येष्ठ फौजदारी विधिज्ञांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
आकोट येथील रॉकेलचा ट्रक प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकार्यांची कानउघाडणी केली असून, पूर्ण माहिती घेत आहोत. गुन्हे आढावा बैठकीमध्ये रॉकेल प्रकरणावर चांगलीच चर्चा करण्यात आली. आणखी चौकशी करून लवकरच दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.
-चंद्रकिशोर मीणा,
पोलीस अधीक्षक.