कवठा-धनकवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:14 AM2021-07-10T04:14:26+5:302021-07-10T04:14:26+5:30
कवठा-धनकवाडी रस्ता अकोला जिल्हा परिषदअंतर्गत येतो. या चार किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तब्बल २५ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती ...
कवठा-धनकवाडी रस्ता अकोला जिल्हा परिषदअंतर्गत येतो. या चार किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तब्बल २५ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती असून, अद्यापपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कवठा-धनकवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने मोठी घटनेची भीती आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने हा मार्ग अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. (फोटो)
---------------------
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
कवठा-धनकवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढते. या मार्गावर पुंडा, बांबर्डा, कवठा, रोहनखेड, आसेगाव बाजार गावातील नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
---------------------------
पावसाळ्यात वाहतूक होते विस्कळीत!
धनकवाडी-कवठा रस्त्यावरील नाला हा पावसाळ्यात तुडुंब वाहतो. त्यामुळे या मार्गावर पाणी येत असल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन बंद होते. त्यामुळे वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागतो. या नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्याची आवश्यकता असल्याचे मत राजेंद्र धांडे यांनी व्यक्त केले.