किसान मंचचे कार्यकर्ते पाेहोचले पलवल बाॅर्डरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:15 AM2021-01-09T04:15:39+5:302021-01-09T04:15:39+5:30

किसान विकास मंच अकोलाचे संयोजक विवेक पारसकर व संयोजक अविनाश देशमुख यांच्यासह १४० शेतकरी, महिला शेतकऱ्यांसह हे आंदाेलक ...

Kisan Manch activists reached Palwal border | किसान मंचचे कार्यकर्ते पाेहोचले पलवल बाॅर्डरवर

किसान मंचचे कार्यकर्ते पाेहोचले पलवल बाॅर्डरवर

Next

किसान विकास मंच अकोलाचे संयोजक विवेक पारसकर व संयोजक अविनाश देशमुख यांच्यासह १४० शेतकरी, महिला शेतकऱ्यांसह हे आंदाेलक कृषी कायद्याच्या संदर्भात मार्गावरील लाेकांना सत्य परिस्थती कथन करत आहेत. देशाला अंधारात ठेवून केंद्र सरकारने केलेले तीन काळे कायदे रद्द झालेच पाहिजे याकरिता सर्वांनीच आंदाेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करत हे कार्यकर्ते पलवल येथे दाखल झाले आहेत.

पलवल येथील आंदोलन प्रमुखांनी अकोल्यातून आलेल्या सर्व आंदोलकांचे स्वागत केले व आभार मानले.

यावेळी आंदोलनाचे नियोजन करणारे जीत सिंग, जगन चौधरी, बालराजसिंग, महेंद्रसिंग चव्हाण, यांच्या सोबत आंदोलकांची चर्चा झाली. आंदोलन करणाऱ्यांबद्दल चुकीच्या अफवा काही लोक पसरवित असल्याची त्यांनी जाणीव करून दिली व तीन काळे कायदे रद्द होईपर्यंत शांत बसणार नाही, असे सर्वानुमते ठरले आहे.

यावेळी राजू पाटील, आलमगीर खान, अमोल नळकाडे, मनीषा महल्ले, गीता अहिरे, सुनीता धुरंधर, बबिता लुले, दिगंबर बोर्डे, रहमनभाई, प्रवीण आवारे, वैभव मगर, कदरभाई, गोपाळ चतरकार आदी सहभागी झालेत.

Web Title: Kisan Manch activists reached Palwal border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.