किशोर खत्री हत्याकांडाची आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:27 AM2017-10-31T01:27:42+5:302017-10-31T01:29:40+5:30

अकोला : शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर  खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये अँड. उज्ज्वल निकम सोमवारी  विशेष सरकारी वकील म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर  झाले. मात्र एका साक्षीदाराची प्रकृती ठिक नसल्याने तसेच  तांत्रिक कारणामुळे ही सुनावणी आता मंगळवारी होणार आहे.  या हत्याकांड प्रकरणात अँड. निकम साक्षीदार तपासणार आहेत.  त्यानंतर पुढील सुनावणीस न्यायालयात प्रारंभ होणार आहे. 

Kishore Khatri assassination case hearing today | किशोर खत्री हत्याकांडाची आज सुनावणी

किशोर खत्री हत्याकांडाची आज सुनावणी

Next
ठळक मुद्देप्रसिद्ध विधिज्ञ अँड. निकम मांडणार बाजू 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर  खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये अँड. उज्ज्वल निकम सोमवारी  विशेष सरकारी वकील म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर  झाले. मात्र एका साक्षीदाराची प्रकृती ठिक नसल्याने तसेच  तांत्रिक कारणामुळे ही सुनावणी आता मंगळवारी होणार आहे.  या हत्याकांड प्रकरणात अँड. निकम साक्षीदार तपासणार आहेत.  त्यानंतर पुढील सुनावणीस न्यायालयात प्रारंभ होणार आहे. 
 खोलेश्‍वर परिसरात निमार्णधीन असलेल्या बालाजी मॉलच्या  आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची ३ नोव्हेंबर  २0१५ रोजी सोमठाणा शेत शिवारात गोळय़ा झाडून तसेच  धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे  एकच खळबळ उडाली होती. हत्याकांडाची माहिती मिळताच  वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन याप्रकरणी  जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलिसांनी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले हो ते. दरम्यान, खत्री हत्याकांडप्रकरणी अँड. उज्ज्वल निकम यांची  नियुक्ती करण्यात आली असून, चार टप्प्यांमध्ये ते सुनावणीसाठी  हजर राहणार असल्याची माहिती आहे. यासाठी अँड. निकम  रविवारी रात्रीच अकोल्यात दाखल झाले असून, सोमवारी ते  साक्षीदार तपासणार होते, मात्र आता ही सुनावणी मंगळवारपासून  होणार आहे.

या आरोपींचा आहे समावेश
बिल्डर किशोर हत्याकांडप्रकरणी रणजितसिंह चुंगडे, रुपेश  चंदेल, जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहरे हे आरोपी  आहेत. हत्याकांडानंतर यामधील जस्सी, चुंगडे फरार झाले होते,  मात्र दोन्ही आरोपींची आर्थिक नाकेबंदी केल्यानंतर, या आरो पींनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती.

निर्माणाधीन मॉलची पाहणी
ज्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री  यांची हत्या करण्यात आली होती, त्या निर्माणाधीन मॉलची  विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांनी सोमवारी  रात्री पाहणी केली. चित्रा टॉकीजच्या ंजागेवर हा मॉल उभा  असून, त्यामागील जागेचीही निकम यांनी पाहणी केली.

Web Title: Kishore Khatri assassination case hearing today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.