किशोर खत्री हत्याकांड; जी. श्रीकांत यांची साक्ष नोंदविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:54 AM2018-02-27T01:54:46+5:302018-02-27T01:54:46+5:30

अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच गजानन थाटे नामक पोलीस कर्मचार्‍याची साक्ष तपासली. या बहुचर्चित हत्याकांडप्रकरणी सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्‍जवल निकम हे उपस्थित होते.  सोमठाणा शेत शिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली

Kishore Khatri murder case; G. Shrikant's testimony is recorded! | किशोर खत्री हत्याकांड; जी. श्रीकांत यांची साक्ष नोंदविली!

किशोर खत्री हत्याकांड; जी. श्रीकांत यांची साक्ष नोंदविली!

Next
ठळक मुद्देतत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच गजानन थाटे नामक पोलीस कर्मचार्‍याची साक्ष तपासलीसरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्‍जवल निकम हे उपस्थित होते

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच गजानन थाटे नामक पोलीस कर्मचार्‍याची साक्ष तपासली. या बहुचर्चित हत्याकांडप्रकरणी सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्‍जवल निकम हे उपस्थित होते.  सोमठाणा शेत शिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 
या हत्याकांडप्रकरणी रणजितसिंग चुंगडे, रुपेश चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहेरे हे आरोपी आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर २0१७ पासून या प्रकरणात आरोपींच्या व सरकार पक्षाकडून साक्षीदार तसेच तक्रारकर्त्यांची तपासणी व उलट तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये दिल्ली येथील बांधकाम व्यावसायिक प्रवीणसिंग कुशवाह आणि सोमठाणाचे पोलीस पाटील किशोर दुतोंडे यांच्यासह प्रत्यक्ष साक्षीदार रवी दुतोंडे यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. त्यानंतर गृह खात्याचे सचिव यांचीही साक्ष न्यायालयाने तपासली. त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व पोलीस कर्मचारी गजानन थाटे यांची साक्ष जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी तपासली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १२ व १३ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. या सुनावणीसाठीही विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्‍जवल निकम उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Kishore Khatri murder case; G. Shrikant's testimony is recorded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.