किडनी तस्करी प्रकरणामधील आरोपीस गुरुवारपर्यंंत कोठडी
By admin | Published: February 10, 2016 02:16 AM2016-02-10T02:16:17+5:302016-02-10T02:16:17+5:30
बनावट कागदपत्रे तयार करणा-या आरोपीस ११ फेब्रुवारीपर्यंंत पोलीस कोठडी.
अकोला: किडनी तस्करी प्रकरणामध्ये बनावट कागदपत्रे तयार करणारा आरोपी प्रमोद विश्वास शेजव(४0 रा. महाकाली नगर, जुने शहर) याला खदान पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ११ फेब्रुवारीपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. किडनी तस्करी प्रकरणातील बनावट दस्तावेज बनविण्याप्रकरणी हरिहरपेठ रहिवासी महेंद्र ऊर्फ महेश मधुकर तायडे याला खदान पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यालाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, किडनी तस्करी प्रकरणामध्ये महेंद्र तायडे याला बनावट कागदपत्रे तयार करून देण्यासाठी मदत करणारा प्रिन्टींग व्यवसायी प्रमोद विश्वास शेजव याला खदान पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यालाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.