लोकसहभागातून उभारले कोविड केअर सेंटर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:43+5:302021-06-19T04:13:43+5:30
नगरपरिषद कार्यालय परिसरातील दोन मजली नूतन इमारतीत लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आमदार हरीष पिंपळे, नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे ...
नगरपरिषद कार्यालय परिसरातील दोन मजली नूतन इमारतीत लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आमदार हरीष पिंपळे, नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपनगराध्यक्ष सुनील पवार, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, मुख्याधिकारी विजय लोहकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे, डॉ. विजय वाडेकर, आलिया तब्बसुम नासिरूद्दीन, द्वारकाप्रसाद दुबे, प्रशांत डाबेराव, रवी इंगळे, सुनील लशुवानी, सर्व नगरसेवक, समाजसेवक कमलाकर गावंडे, संदीप जळमकर, नासिर, राहुल गुल्हाने, देविदास गोले, कैलास महाजन व नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार पिंपळे यांनी जिल्हाधिकारी पापळकर यांचा शाल, श्रीफळ व संत गाडगेबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला. भविष्यात तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता सुसज्ज अशा कोविड सेंटरची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यामध्ये गटविकास अधिकारी बैस, गटशिक्षण अधिकारी संजय मोरे, प्रकाशवाट प्रकल्प अध्यक्ष अविनाश बाम्बल, कैलास सोळके, सर्व संघटनांचे अध्यक्ष, सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक वर्ग व सामान्य रुग्णालय, तहसील, नगरपालिकेेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शिक्षक, समाजसेवकांनी केली सढळ हाताने मदत
या कोविड सेंटरच्या उभारणीकरिता ४५० शिक्षकांनी ४ लाख ५० हजार, संत नामदेव महाराज संस्था जांभा बु. यांनी २ लाख, नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडून कूपनलिका व इलेक्ट्रिकल फिटिंग इत्यादी कामाकरिता ३ लाख रुपये व इतर दात्यांकडून ५० हजार रुपये असा १० लाख रुपयांचा निधी लोकसहभागातून उभा करण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दानशूरांचा सत्कार
यावेळी नगराध्यक्षा मोनाली गावंडे यांनी मदत करणाऱ्या सर्व शिक्षक वर्ग, स्वयंसेवी संस्था व सर्व पक्षांचे पदाधिकारी व शहरातील दानशूर व्यक्तीचे आभार व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कोविड सेंटर उभारणी करिता मदत करणारे अधिकारी, शिक्षक वर्ग यांचा सत्कार करण्यात आला.