कोविड रुग्णांना दररोज लागताहेत ९०० ऑक्सिजन सिलिंडर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:19 AM2021-04-01T04:19:50+5:302021-04-01T04:19:50+5:30

गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढ आणि मृतकांचा आकडा पाहता, आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात गंभीर परिस्थिती ...

Kovid patients need 900 oxygen cylinders every day! | कोविड रुग्णांना दररोज लागताहेत ९०० ऑक्सिजन सिलिंडर!

कोविड रुग्णांना दररोज लागताहेत ९०० ऑक्सिजन सिलिंडर!

Next

गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्णसंख्या वाढ आणि मृतकांचा आकडा पाहता, आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात गंभीर परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यंदा कोविडच्या गंभीर रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. मागील पंधरा दिवसात ऑक्सिजनची मागणी दीड पटीने वाढली असून, दररोज सुमारे ९०० ते एक हजार ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गत वर्षी सप्टेंबर महिन्यात हीच स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या होत्या, मात्र मार्च महिन्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे उपलब्ध ऑक्सिजनचा साठाही अपुरा ठरत आहे. सोमवारी जिल्ह्याला आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोरोनावर नियंत्रणाची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन देखील आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.

अनेक कोविड रुग्णांवर विनाचाचणीच उपचार सुरू

जिल्ह्यात अनेक कोविड रुग्णांवर केवळ सीटी स्कॅन अहवालाच्या आधारावर कोरोनाचा उपचार सुरू आहे. अशा रुग्णालयांमध्येही ऑक्सिजन सिलिंडरची अतिरिक्त मागणी वाढली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

सर्वोपचार रुग्णालयाला ऑक्सिजन टँकने तारले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रत्येकी १० केएल क्षमतेची एक, अशा एकूण दोन ऑक्सिजन टँक बसविण्यात आल्या आहेत. कोविड रुग्णांची संख्या वाढत असली, तरी सर्वोपचार रुग्णालयात यंदा मुबलक ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.

Web Title: Kovid patients need 900 oxygen cylinders every day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.