राज्यातील १२ जिल्ह्यातील कोविड रुग्णांवर झाले जीएमसीत उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:14 AM2021-06-05T04:14:21+5:302021-06-05T04:14:21+5:30

जीएमसीत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या जिल्हा - मृत्यू संख्या बुलडाणा - १८५ वाशिम - ...

Kovid patients treated in 12 districts of the state with GM! | राज्यातील १२ जिल्ह्यातील कोविड रुग्णांवर झाले जीएमसीत उपचार!

राज्यातील १२ जिल्ह्यातील कोविड रुग्णांवर झाले जीएमसीत उपचार!

Next

जीएमसीत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या जिल्हा - मृत्यू संख्या

बुलडाणा - १८५

वाशिम - ६८

हिंगोली - ०९

अमरावती - २९

नांदेड - ०२

भंडारा - ०२

यवतमाळ - ०४

औरंगाबाद - ०१

जळगाव - ०२

नागपूर - ०४

सोलापूर - ०१

नवी मुंबई ०१

----------------

एकूण - १२३८

मनुष्यबळ कमी असूनही वाचविले अनेकांचे प्राण

कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या लक्षणीय होती. यामध्ये बहुतांश रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले होते. शिवाय, बाहेरील जिल्ह्यातील अनेक रुग्णांनी अकोल्यातील जीएमसीतच उपचारासाठी धाव घेतली होती. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत येथील मनुष्यबळ अपुरे ठरत होते; मात्र रुग्णालय प्रशासनासोबतच येथील वैद्यकीय अधिकारी, व कर्मचाऱ्यांनी हिंमत न हारता कोविडच्या रुग्णांची रुग्णसेवा निरंतर सुरू ठेवली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात जीएससीला मोठे यश आले.

अकोल्यासह बाहेरील जिल्ह्यातील अनेक रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले होते. यातील अनेकांचे प्राण वाचविणे शक्य झाले; मात्र लांबचा पल्ला गाठून आलेले रुग्ण रुग्णालयात दाखल झाले तोवर त्यांची प्रकृती आणखी गंभीर झालेली होती. अशा रुग्णांनी उपचारास साथ दिली नाही. असे असले तरी अनेक गंभीर रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला

Web Title: Kovid patients treated in 12 districts of the state with GM!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.