बोरगाव मंजू येथे कोविड स्वॅब तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:18 AM2021-03-14T04:18:31+5:302021-03-14T04:18:31+5:30
बोरगाव मंजू : प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो अंतर्गत येणाऱ्या बोरगाव मंजू येथे दि. १३ मार्चला ॲलोपेथिक रुग्णालयात कोविड-१९ ...
बोरगाव मंजू : प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो अंतर्गत येणाऱ्या बोरगाव मंजू येथे दि. १३ मार्चला ॲलोपेथिक रुग्णालयात कोविड-१९ निदान स्वॅब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात केवळ २६ जणांनीच तपासणी केली, तर इतर ग्रामस्थांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, बोरगाव मंजू येथील रुग्णसंख्या ३७ वर पोहोचली आहे. कोरोनाचा ससंर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर गावात कोविड निदान स्वॅब तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अकोला उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. निलेश अपार, अकोला पंचायत समिती गटविकास अधिकारी राहुल शेळके, सहायक गटविकास मदनसिंग बहुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली पवार, ग्रामविकास अधिकारी विनोद वसू, डॉ. अमोल देशमुख, डॉ ताकवाले, डॉ.श्रुती गिरे, डॉ. राहिमीन खान,आरोग्य सहायक विलास खडसे, आरोग्य आरोग्य सेवक, अजय मंगळे, आनंद डामरे, अनुकूल ठाकरे, आरोग्य सेविका वर्षा ठाकरे, आशा स्वयंसेविका यांनी विशेष सहकार्य केले. (फोटो)
------------------------------------------
वाडेगाव येथे कोविड लसीकरण
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आठवड्यातून तीन दिवस कोविड लसीकरण करण्यात येते. या लसीकरण मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा मसने व डॉ. शुभांगी घुगे यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिबिराला गावातून अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा मसने व डॉ. शुभांगी घुगे यांनी केले आहे.