अजित-पर्व अंतर्गत कोविड योद्धा गुरुजनांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:18 AM2021-07-26T04:18:29+5:302021-07-26T04:18:29+5:30

यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, महिला नेत्या डॉ. आशा ...

Kovid warrior gurus felicitated under Ajit-Parva | अजित-पर्व अंतर्गत कोविड योद्धा गुरुजनांचा सत्कार

अजित-पर्व अंतर्गत कोविड योद्धा गुरुजनांचा सत्कार

Next

यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, महिला नेत्या डॉ. आशा मिरगे, ओबीसी नेते प्रा. विजय उजवणे, राष्ट्रवादी युवक आघाडी जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, पक्षाचे विविध फ्रंटल जिल्हाध्यक्ष सुषमा कावरे, विद्याताई अंभोरे, मेघा पाचपोर, अर्चना थोरात, प्रा. जया नवलकार, किरण पवार, परिमल लहाने, पंकज गावंडे, विशाल गावंडे, गणेश राऊत विराजमान होते.

यावेळी कोविडच्या दुसऱ्या लाटेत, सर्वत्र संचारबंदी लागू असल्यामुळे कोविड रुग्ण व रुग्णालयात त्यांची शुश्रूषा करणारे त्यांचे आप्तेष्ट यांची जेवणाकरिता होत असणारी परवड लक्षात घेत स्वत:ची उन्हाळ्याची सुट्टी बाजूला ठेवत, जि.प. दापुरा केंद्रातील शिक्षक-शिक्षिकांनी स्वत: निधी उभारुन त्यांची जेवणाची व्यवस्था थेट त्यांच्या बेडपर्यंत उपलब्ध करुन दिली होती. त्यांच्या या अन्न पेढी उपक्रमाचे राज्यभर कौतुकही झाले होते. त्या कोविड योद्धा शिक्षक-शिक्षिका सर्वश्री आशा श्रीकांत पिसे पाटील, दापुरा केंद्र प्रमुख श्रीकृष्ण रामभाऊ गावंडे, वंदना रमेश चव्हाण, अनिता अंबादास पांडे, कल्पना विजय काटे, अनिता गौतम खैरनार, सविता शेषराव खिल्लार, वैशाली माधवराव सावरकर, सुधा रामदास सुसतकर, बबिता पुंडलिक धनी, पुंडलिक विश्वनाथ भदे, राजेंद्र सुरेश पाटोळे, चेतन प्रल्हाद सरदार, नरेश विश्वनाथ तायडे, प्रकाश विश्वनाथ भोगे, राहुल सुभाषराव देशमुख, नंदकिशोर गोविंदराव इंगळे, गजानन डिगांबर खेडकर, मधुबाला गोकुळदास कलंत्री, गोपाल श्रीकृष्ण ढोरे यांना शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गुरु पौर्णिमेला गुरु दक्षिणा देत भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सुषमा कावरे यांनी केले. (वा.प्र.)

फोटो:

Web Title: Kovid warrior gurus felicitated under Ajit-Parva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.