जीएमसीत ५० शिकाऊ डॉक्टरांवर कोविडचा भार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:18 AM2021-04-08T04:18:28+5:302021-04-08T04:18:28+5:30

कोविड रुग्णांवर स्त्रीरोग अन् त्वचारोगतज्ज्ञ करताहेत उपचार सर्वोपचार रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने उपलब्ध मनुष्यबळावर कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहे. ...

Kovid's burden on 50 trainee doctors from GM! | जीएमसीत ५० शिकाऊ डॉक्टरांवर कोविडचा भार!

जीएमसीत ५० शिकाऊ डॉक्टरांवर कोविडचा भार!

Next

कोविड रुग्णांवर स्त्रीरोग अन् त्वचारोगतज्ज्ञ करताहेत उपचार

सर्वोपचार रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने उपलब्ध मनुष्यबळावर कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये सर्वोपचार रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असलेल्या ५० शिकाऊ डॉक्टरांचा समावेश असून ते त्वचा विकार, स्त्री रोग, नेत्ररोग आदि विभागाशी निगडित डॉक्टर असल्याचे शिकाऊ डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कोविडवरील उपचारासाठी आवश्यक छातीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची मागणीही शिकाऊ डॉक्टरांनी केली.

या आहेत मागण्या

कोविड स्पेशालिस्ट डॉक्टर नियुक्त करा.

शैक्षणिक शुल्क कमी करा.

शिकाऊ डॉक्टरांना कोरोना ड्यूटीतून रिलिव्ह करा.

नॉनकोविड रुग्णांवरही उपचार सुरू ठेवा.

पाच डॉक्टर पॉझिटिव्ह

सर्वाेपचार रुग्णालयात कोविड वॉर्डात सेवा देणाऱ्या ५० शिकाऊ डॉक्टरांपैकी सद्यस्थितीत ५ डॉक्टर पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत १६ पेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोनाची लागण होऊन गेली असून, यातील काहींना पोस्ट कोविडची समस्याही उद्भवत असल्याचे शिकाऊ डॉक्टरांनी सांगितले.

सर्वोपचार रुग्णालयातील कोविड रुग्णांचा संपूर्ण भार हा शिकाऊ डाॅक्टरांवर आहे. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात अधिष्ठाता यांच्याशी चर्चा केल्यास आमचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याच्या धमक्या मिळतात. आमच्या शैक्षणिक नुकसानासह नॉनकोविड रुग्णांकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आमच्या मागण्यांसंदर्भात आम्ही बुधवारी अधिष्ठाता यांच्यासह जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. मागण्या मान्य होत नसतील, तर आम्ही तीव्र आंदोलन पुकारू.

- डॉ. संदीप हाडे, उपाध्यक्ष, सेंट्रल मार्ड, अकाेला

Web Title: Kovid's burden on 50 trainee doctors from GM!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.