अखर्चित तीन कोटींच्या निधीतून ‘कृषी’च्या योजना राबविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:37 PM2018-08-11T13:37:52+5:302018-08-11T13:39:05+5:30

अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सन २०१६-१७ मधील अखर्चित निधीतून चालू आर्थिक वर्षात कृषी विभागामार्फत विविध दहा योजना राबविण्यास जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.

 'Krishi' scheme will be implemented from the funding of Rs. 3 crores! | अखर्चित तीन कोटींच्या निधीतून ‘कृषी’च्या योजना राबविणार!

अखर्चित तीन कोटींच्या निधीतून ‘कृषी’च्या योजना राबविणार!

googlenewsNext
ठळक मुद्दे विविध योजनांतर्गत सन २०१६-१७ या वर्षात तीन कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. शेतकºयांसाठी वैयक्तिक लाभाच्या विविध दहा योजना राबविण्यास समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सन २०१६-१७ मधील अखर्चित निधीतून चालू आर्थिक वर्षात कृषी विभागामार्फत विविध दहा योजना राबविण्यास जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. या विषयाला सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याचेही सभेत ठरविण्यात आले.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत सन २०१६-१७ या वर्षात तीन कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. या अखर्चित निधीतून यावर्षी कृषी विभागामार्फत शेतकºयांसाठी वैयक्तिक लाभाच्या विविध दहा योजना राबविण्यास समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी हा विषय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्याचेही सभेत ठरविण्यात आले. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांच्या मुद्यांवरही या सभेत चर्चा करण्यात आली. कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, रमन जैन, डॉ. हिंमत घाटोळ, शोभा शेळके, विलास इंगळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शिक्षण समितीच्या सभेत
केवळ इतिवृत्त मंजूर!
जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेत कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला नसून, केवळ समितीच्या मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. शिक्षण व अर्थ सभापती पुंडलीकराव अरबट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य उपस्थित होते. प्राथमिक शिक्षणाधिकारी मात्र सभेला उपस्थित नव्हते. त्यामुळे संबंधित मुद्यांवर या सभेत चर्चा होऊ शकली नाही.

 

Web Title:  'Krishi' scheme will be implemented from the funding of Rs. 3 crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.