खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत अकोल्याच्या कृष्णा घोडकेला कांस्य पदक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 09:15 PM2018-02-14T21:15:07+5:302018-02-14T21:16:34+5:30
अकोला : दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया स्कूल गेम्समध्ये अकोल्याच्या कृष्णा घोडके याने ४२ किलो वजन गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत तृतीय स्थान मिळवून कांस्य पदक पटकाविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया स्कूल गेम्समध्ये अकोल्याच्या कृष्णा घोडके याने ४२ किलो वजन गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत तृतीय स्थान मिळवून कांस्य पदक पटकाविले.
केंद्रीय सरकार अंतर्गत नव्याने सुरू झालेल्या खेलो इंडिया स्कूल गेम्समध्ये सुरुवातीला कृष्णाची कुस्ती क्रीडा स्पर्धेतून राज्य स्तरावर निवड झाली. पुणे येथे झालेल्या राज्यस्तर स्पर्धेतून राष्ट्रीय स्तर स्पर्धेकरिता प्रवेश निश्चित केला. यानंतर दिल्ली येथे ३ ते १0 फेब्रुवारी या कालावधीत इंदिरा गांधी स्टेडिअम येथे पार पडलेल्या स्पर्धेत कृष्णाने ४२ किलो वजन गटात तृतीय स्थान मिळविले.
कृष्णा हा सामान्य घरातील मुलगा असून, त्याच्या पालकांनी कुस्ती खेळाकरिता त्याला प्रोत्साहन दिले. ज्योती जानोळकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचारी अशोक घोडके यांचा कृष्णा मुलगा आहे. कृष्णाने आपल्या परिवाराची कुस्ती परंपरा जोपासली आहे. कृष्णाला गुरू राजेंद्र गोतमारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक लक्ष्मीशंकर यादव यांचे मार्गदर्शन लाभले.