‘पद्मावत’च्या विरोधात क्षत्रिय महासभेची निषेध रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:02 AM2018-01-25T02:02:56+5:302018-01-25T02:03:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या अकोला जिल्हा युवा शाखेच्यावतीने शेकडो राजपूत युवकांनी पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ नये, याकरिता निषेध रॅली काढली आणि चित्रपटगृह संचालकांना निवेदन दिले. अ.भा.क्ष. महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजय सेंगर, युवा प्रदेश अध्यक्ष मनोजसिंह बिसेन, विदर्भ उपाध्यक्ष विनोदसिंह ठाकूर, विदर्भ प्रदेश कार्यकारिणी मार्गदर्शक बादलसिंह ठाकूर,राजूसिंह ठाकूर, युवा शाखेचे मार्गदर्शक संजयसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनात ही रॅली काढण्यात आली.
क्षत्रिय महासभेच्या युवा शाखेने कौलखेड चौकापासून चित्रपटगृहापर्यंत रॅली काढली. या दरम्यान आ. गोवर्धन शर्मा आणि आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी राजपूत समाजाची भावना लक्षात घेता पूर्ण सर्मथन दिले. युवा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष सूरजसिंह ठाकूर, कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष राजकमलसिंह चौहान, महानगर अध्यक्ष आशिषसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांनी या निषेध रॅलीमध्ये सहभाग घेतला.
यावेळी विक्रम (छोटू) गावंडे, सिद्धार्थ वरोटे, नगरसेवक, सुजितसिंह ठाकूर, धीरज गौतम, नवज्योत, बघेल, मनीष बिसेन, संदीप ठाकूर, निखिल ठाकूर, राकेशसिंह बैस, दिनेश ठाकूर, पप्पू ठाकूर, कपिल गौतम, आकाश ठाकूर, आनंद चौहान, सौरभ चौहान, हर्षल गौतम, गौरव चौहान, राहुल ठाकूर, गोपाल ठाकूर, सौरभ ठाकूर, छोटू ठाकूर, वीरेंद्र ठाकूर, विश्वजित राजपूत, प्रेम राजपूत, महेंद्र राजपूत, प्रतीक राजपूत, शिवा ठाकूर, मयूर ठाकूर, अजय ठाकूर, वीरेंद्र बघेल, हिरा ठाकूर, गुड्ड ठाकूर, शुभम ठाकूर उपस्थित होते.
आज कडेकोट पोलीस बंदोबस्त
‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होणार असून, त्यासाठी जिल्हय़ात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांचीही करडी नजर राहणार असून, कुठेही अनुचित प्रकार होत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. अकोला शहरातील तीन चित्रपटगृहांसह अकोट व मूर्तिजापूर येथील चित्रपटगृहात पद्मावत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे; मात्र अकोल्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल की नाही, यासंदर्भात स्पष्ट माहिती नाही. दरम्यान या सर्व चित्रपटगृहासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, छायाचित्रण करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हय़ात कुठेही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
‘पद्मावत’ संदर्भात पोलिसांचा अँक्शन प्लॅन तयार असून, प्रत्येक ठिकाणी छायाचित्रण करण्यात येणार आहे. दर्शकांनी शांततेत हा चित्रपट पाहण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच आंदोलकांनी आंदोलन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
- एम. राकेश कलासागर,
पोलीस अधीक्षक, अकोला.