‘त्या’ मनोरुग्ण महिलेसाठी कुरणखेडकर ठरले देवदूत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:29+5:302021-07-18T04:14:29+5:30
वणी रंभापूर : येथून जवळच असलेल्या कुरणखेड येथील मुख्य चौकात अनेक वर्षांपासून एक मनोरुग्ण महिला वास्तव्यास होते. ग्रामस्थांकडून तिला ...
वणी रंभापूर : येथून जवळच असलेल्या कुरणखेड येथील मुख्य चौकात अनेक वर्षांपासून एक मनोरुग्ण महिला वास्तव्यास होते. ग्रामस्थांकडून तिला जेवण आदी सुविधा पुरवण्यात येतात; मात्र कोरोनाच्या संकटात तिचे हाल होत होते. ही बाब लक्षात घेऊन कुरणखेड येथील युवकांनी पुढाकार घेत निधी जमा केला व त्या मनोरुग्ण महिलेला बुलडाणा जिल्ह्यातील सेवा संकल्प प्रतिष्ठानमध्ये दाखल केले.
कुरणखेड येथील मुख्य चौकात एक मनोरुग्ण महिला गेल्या कित्येक वर्षापासून येथे वास्तव्यास होती. पावसाळाच्या दिवसात तिचे हाल होत होते. कुरणखेड येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश विजयकर यांना बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड सपकाळ येथील बेघर व बेसहारा मनोरुग्णासाठी आश्रय देणाऱ्या मित्र सेवा संकल्प प्रतिष्ठानविषयी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी प्रतिष्ठानचे डॉ. नंदकुमार पालवे यांच्याशी चर्चा करून महिलेविषयी सांगितले. त्यानंतर डॉ. पालवे यांनी त्या मनोरुग्ण महिलेला आश्रमात आणण्यासाठी होकार दिला. मनोरुग्ण महिलेला सेवा संकल्प आश्रमात नेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत निधी जमा केला. त्या महिलेला रंजीत घोगरे, वीरेंद्र देशमुख यांनी सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड सपकाळ येथे नेले. यावेळी नरेंद्र देशमुख, अजाब टेकाळे, पिंटू देशमुख यांचे सहकार्य लाभले.
---------------------------------- (फोटो)